NRI Property Deal : अनिवासी भारतीयांकडून कोणत्याही प्रकारची संपत्ती खरेदी केल्यावर खरेदीदाराला एकुण व्यवहारांवर 20 टक्के टीडीएस कापावा लागतो. आयकर विभागाच्या कलम 195 नुसार हा कर आकारला जातो. यामध्ये सरचार्ज व सेस कर सुद्धा कापला जातो. जर ही संपत्ती अनिवासी भारतीयाच्या ताब्यात दोन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी होती असेल तर त्यावर 30 टक्क्यापर्यंतचा टीडीएस कापला जातो.
भारतातील संपत्ती संदर्भात हा व्यवहार भारतात किंवा भारता बाहेर जरी झाला तरी आयकर विभागाच्या नियमांनुसार टीडीएस हा भरावा लागतो. ज्यावेळी दोन भारतीय व्यक्तींमध्ये संपत्ती संदर्भात व्यवहार होतो तेव्हा त्यासाठी 1 टक्के टीडीएस भरावा लागतो. मात्र, अनिवासी भारतीय व्यक्तीकडून संपत्ती विक्री केली जाते तेव्हा त्यावर 20 टक्के वा त्याहून अधिक टीडीएस आकारला जातो.
दरम्यान, या सर्व व्यवहारांमध्ये कमी कर कपात व्हावी यासाठी अनिवासी भारतीय कमी कर कपातीसाठी अर्ज दाखल करू शकतात. पाहुयात यासाठी आयकर विभागाने काय पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
कमी कर कपात प्रमाणपत्र ( Lower Tax Deduction Certificate)
अनिवास भारतीय व्यक्तीला आपल्या संपत्ती विक्रीवरील कर वाचवायचा असेल किंवा टिडीएस कमी करायचा असेल तर त्या व्यक्तीला आयकर विभागाकडे कमी कर कपातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.
यासाठी अनिवासी भारतीय व्यक्तीला प्रथम आपल्या संपत्तीचे मूल्य आयकर विभागाला दाखवावे लागते. यासाठी अनिवासी भारतीय व्यक्तीला त्यांने ज्या वर्षी ती संपत्ती खरेदी केलेली तेव्हाचे त्याचे मूल्य व आता बाजारभावानुसार त्या संपत्तीचे मूल्य हे आयकर विभागापुढे सादर करावे लागते व ते पटवून द्यावं लागतं.
उदा. जर का अनिवासी भारतीय व्यक्तीने 2 कोटी रूपयाला आपली संपत्ती विकत असेल तर जवळपास 48 लाख रूपये टीडीएस व अन्य कर भरावे लागतील. मात्र, या व्यक्तीने ही संपत्ती खरेदी केली तेव्हा त्याचे मूल्य हे 60 लाख असले आज त्या संपत्तीचे मूल्य 80 लाख झालं असेल. तर त्या व्यक्तीचे आताचे उत्पन्न हे 1.20 कोटी असणार आहे. मग त्या व्यक्तीला लागणार कर हा 2 कोटी ऐवजी 1.20 कोटी वर लागेल. ही कर पात्र रक्कम आयकर विभागाला पटवून दिल्यावर व तुम्ही सादर करत असलेल्या कागदपत्राची तपासणी करून आयकर विभागाकडून तुम्हाला Lower Tax Deduction Certificate दिलं जातं. या प्रमाणपत्रानुसार अनिवासी भारतीय त्याच्या एकूण विक्री व्यवहारावर संपत्ती मूल्यानुसार कर भरू शकतो.
Lower Tax Deduction Certificate साठी कोणती कागदपत्रे सादर करावी
या प्रमाणपत्रासाठी अनिवासी भारतीय व्यक्तीला पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात.
- भांडवली लाभ कर (Capital Gain Certificate) व भारतातून मिळत असलेल्या अन्य उत्पनांची कागदपत्रे
- संबंधित संपत्ती विक्रीचे व संपत्ती खरेदी केलेली त्याचे कागदपत्रे (संपत्तीच्या मूल्याच्या पडताळणीसाठी)
- यानंतर कागदपत्रांची तपासणी करून आयकर विभागाकडून 30 दिवसात प्रमाणपत्र दिलं जातं.
कर परतावा कसा मिळवावा
अनिवासी भारतीय व्यक्तीला जर या व्यवहारावर पूर्ण कर वाचवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मार्ग आहे.
जर अनिवासी भारतीय व्यक्तीने तीन वा त्याहून अधिक वर्षापूर्वी संपत्ती खरेदी करून विकली असेल तर त्यातून मिळालेला भांडवली लाभ हा तो व्यक्ती आयकर विभागाच्या सेक्शन 54 व सेक्शन 54 EC अंतर्गत गुंतवणूक करु शकतो. ही गुंतवणूक केल्यानंतर तो व्यक्ती पॅन कार्डच्या साहय्याने विवरण पत्र (ITR) भरून कर परतावा मिळवू शकतो.