PM Suraksha Bima Yojana: देशाच्या विकासासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सरकारी योजना. सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. दुर्दैवाने कुटुंबप्रमुखाचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळतो. त्यांना आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे कुटुंब निराधार होते. या समस्या लक्षात घेता केंद्र सरकार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवत आहे. या योजनेत 20 रुपये गुंतवून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
2 लाख रुपयांचे विमा संरक्षण
विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. याशिवाय व्यक्ती पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर पॉलिसीधारक अंशतः अपंग झाल्यास त्याला एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करू शकते.
योजनेमध्ये तुम्हाला दरवर्षी 20 रुपये प्रीमियम भरावा लागेल. प्रीमियमची ही रक्कम ऑटो डेबिट केली जाते. ही रक्कम दरवर्षी 31 मे रोजी आपोआप कट केली जाते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनी सहजपणे या योजनेवर दावा करू शकतो. यासाठी नॉमिनीला विमा कंपनी किंवा बँकेकडे जावे लागेल. तिथे जाऊन तुम्ही सहजपणे या योजनेचा दावा करू शकता.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत धारकाला 2 लाख रुपयांचा अपघाती जीवन विमा दिला जाणार आहे.
- यासोबतच अंशत: नुकसान झाल्यास एक लाखाचा विमाही दिला जाणार आहे.
- या विमा रकमेसाठी, धारकाला वर्षाला फक्त 20 रुपये म्हणजेच प्रीमियम म्हणून 1 रुपये प्रति महिना भरावे लागतील.
- भविष्यात, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जन धन योजनेशी जोडली जाईल.