Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bima Sugam Portal : आता विमा क्षेत्रातही सुरू होणार UPI सारखी सेवा

Bima Sugam Portal : आता विमा क्षेत्रातही सुरू होणार UPI सारखी सेवा

Bima Sugam Portal: विमा सुगम पोर्टलच्या माध्यमातून पॉलिसीधारक (Policyholder) त्यांच्या सर्व पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस करू शकतील. विमा क्षेत्रात युपिआयसारखी सेवा सुरू होणार असल्याचीही चर्चा सुरू आहे, याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Bima Sugam Portal: काही दिवसांपूर्वीच विमा सुगम पोर्टल लाँच (Bima Sugam Portal Launched) झाले आहे. पॉलिसी घेण्यापासून ते क्लेम सेटलमेंटपर्यंत (Claim Settlement) सर्व सुविधा विमा सुगमवर उपलब्ध असतील, अशी माहिती आयआरडीएआयच्या अध्यक्षांनी दिली आहे. विमा सुगम हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे सर्व विमा पॉलिसी लिस्टेड केल्या जातील. ग्राहक त्यांच्या आवडीची विमा पॉलिसी येथे निवडू शकतात. पॉलिसीधारक (Policyholder) त्यांच्या सर्व पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस करू शकतील. विमा क्षेत्रात युपिआयसारखी सेवा सुरू होणार असल्याचीही चर्चा सुरू आहे, याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

विमा क्षेत्रात UPI सारखी सेवा 

विमा नियामक IRDAI विमा सुगम पोर्टलवर (Bima Sugam Portal) वेगाने काम करत आहे. हे विमा पॉलिसी विक्री, नूतनीकरण आणि दाव्यांच्या निपटारासह अनेक सेवांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. IRDAI चे हे पाऊल विमा क्षेत्रातील गेम चेंजर ठरू शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे अध्यक्ष देवाशिष पांडा (Devashish Panda) यांनी सांगितले की, विमा सुगम पोर्टल हे विमा क्षेत्रासाठी UPI सारखी क्रांती आणू शकते. विमा क्षेत्रात नवी प्रणाली UPI प्रमाणेच कार्य करेल. ब्रोकरला देण्यात येणारे 40 % कमिशन वाचणार, त्यामुळे एजेंटची भूमिका यात कमी होईल. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) (UPI) ने ज्याप्रमाणे देशात डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payments) क्रांती घडवून आणली आहे, त्याचप्रमाणे विमा सुगम  देखील करू शकणार आहे. हे एखाद्या शॉपिंग मॉलसारखे (Shopping mall)असेल. शॉपिंग मॉलमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला हवं त्याप्रमाणे खरेदी करू शकता तसेच या पोर्टलवरुनसुद्धा तुम्हाला हवी ती पॉलिसी खरेदी करू शकाल. 

कोणत्या सुविधा मिळतील (What Facilities Will be Available)

विमा सुगम विमा पॉलिसी खरेदी आणि विक्रीसाठी तसेच क्लेम सेटलमेंटकरीता एक-स्टॉप शॉप म्हणून काम करेल. सर्व विमा कंपन्या या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात. हे API (अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसशी) टाय इन करणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवाशीष पांडा यांनी सांगितले की, वैयक्तिक एजंट, वेब एग्रीगेटर्ससह सर्व विमा ब्रोकर्सना  या पोर्टलवर प्रवेश असेल. त्यांना 5 ते 8 % कमिशन घेता येणार आहे. 

पॉलिसी कशी खरेदी केली जाईल (How the policy will be purchased)

पॉलिसीधारक या पोर्टलवरून थेट किंवा ब्रोकरमार्फत विमा खरेदी करू शकतील. त्याचा 'गेट सपोर्ट मोड' (Gate support mode) पॉलिसीधारकांनाही मदत करेल. यासाठी ग्राहक ब्रोकरचीही मदत घेऊ शकतात. पॉलिसीधारक आणि नवीन ग्राहकांना विमा व्यतिरिक्त पेमेंट आणि त्यांच्या आवडीच्या कंपनीसाठी अनेक पर्याय मिळू शकतात. या पोर्टलमुळे अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. फसवणुकीपासून सुद्धा तुम्ही वाचू शकता, काही वेळा ब्रोकरकडून फ्रॉड केला जातो. जर तुम्ही तुम्हाला हवी ती पॉलिसी घेऊन स्वतः पेमेंट केले तर तुमची फसवणूक होण्यापासून वाचवू शकता. 

केवायसी करणे आवश्यक (KYC required)

ग्राहकाने  पोर्टलवर प्रवेश करताच, त्याला आधार क्रमांक विचारला जाईल. आधारद्वारे केवायसी केले जाईल. आधार क्रमांक टाकताच केवायसी तयार होईल. या पोर्टलमध्ये ग्राहकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यांची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाईल.