Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp message edit: आता चुकीला माफी! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार

WhatsApp message edit

Image Source : www.pymnts.com

व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार आहे. हे नवं फिचर मेटा ने लाँच केले आहे. त्यामुळे आता जर मेसेज पाठवताना काही चूक झाली तर मेसेज डिलिट करायची गरज नाही. तुम्ही मेसेज एडिट करून पुन्हा पाठवू शकता. काय आहे हे फिचर कसा मेसेज एडिट करता येईल त्याची माहिती घ्या.

WhatsApp message edit: व्हॉट्सअ‍ॅपने असं फिचर आणलं आहे ज्यामुळे युझर्सला मेसेज सेंड करताना चूक झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. काही वेळा आपण एखाद्याला मेसेज सेंड करतो तेव्हा त्यामध्ये स्पेलिंग एरर किंवा इतर आशयातील चूक होते. मात्र, हा मेसेज एडिट करता येत नव्हता. मात्र, आता मेसेज सेंड केल्यानंतर 15 मिनिटापर्यंत मेसेज एडिट करता येईल.

मेटा चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकेरबर्ग यांनी एक डेमो मेसेज शेअर करत नव्या एडिट फिचरची माहिती दिली. या डेमो मेसेजमध्ये त्यांनी 'बीस्ट ऑफ लक' असा मेसेज सेंड केला. मात्र, एडिट करुन पुन्हा 'बेस्ट ऑफ लक' असा एडिट करून पाठवला. दरम्यान, बीस्ट हे मार्क झुकेरबर्ग यांच्या श्वानाचं नाव असून शब्दांची कोटी करत गमतीशीरपणे त्यांनी या फिचरची माहिती युझर्सला दिली.

जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक म्हणजे 48 कोटींपेक्षा जास्त ग्राहक भारतामध्ये आहेत. (How to edit WhatsApp message) हे फिचर्स सध्या फक्त लाँच केले असून ग्राहकांना पुढील काही आठवड्यात वापरता येईल. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रतिस्पर्धी टेलिग्राम, सिग्नल आणि ट्विटरवरही मेसेज एडिट फिचर आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपनेही हे फिचर आपल्या कोट्यवधी ग्राहकांना देऊ केले आहे.

या फिचरची माहिती मेटा ने ट्विटरवरुनही दिली आहे. "मेसेज एडिट सुविधा आम्ही आजपासून सुरू करत आहोत. त्यामुळे आता काही चूक झाल्यास काळजी करण्याची गरज नाही. मेसेज सेंड केल्यानंतर 15 मिनिटांत तुम्ही एडिट करू शकता" असे ट्विट मेटाने केले आहे. सोबतच हे फिचर कसे काम करते त्याचा शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

बऱ्याच वेळा युझर्सकडून काही टायपिंग एरर झाल्यास किंवा मेसेज सेंड केल्यास आशयामध्ये काही चूक झाल्यास मेसेज डिलिट करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता त्याऐवजी मेसेज एडिट करता येईल. 

जे मेसेज एडिट केलेले असतील ते समोरच्या व्यक्तीला समजेल. कारण, 'एडिटेड' असा टॅग त्या मेसेजच्या खाली दिसेल. मात्र, काय एडिट (दुरूस्त) केले हे समोरच्या व्यक्तीला समजणार नाही.

सेंड केलेला मेसेज एडिट कसा करावा? (How to edit WhatsApp message)

सेंड केलेला मेसेज बोटाने दाबून धरा.

ड्रॉप डाऊन यादीतून एडिट पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला मेसेजमध्ये बदल करता येतील आणि पुन्हा मेसेज सेंड करता येईल

एडिट फक्त 15 मिनिटांच्या आत करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप कसे पैसे कमावते? (How WhatsApp earn money)

व्हॉट्सअ‍ॅप हे युझर्ससाठी मोफत मेसेजिंग अ‍ॅप आहे. जरी ग्राहकांकडून व्हॉट्सअ‍ॅप पैसे घेत नसले तरी ग्राहकांच्या डेटाचा वापर पैसे कमावण्यासाठी करते. व्हॉट्सअ‍ॅप आणि जिओ मार्टमध्ये ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरीसाठी कंत्राट झाले आहे. त्याद्वारे कोट्यवधी ग्राहकांना मोबाईलवरुन किराणा माल आणि इतर सामान ऑर्डर करता येते. या व्यवसायातून व्हॉट्सअ‍ॅपला नफा मिळतो. असे अनेक व्यवसायांसोबत मिळून व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांना थेट सेवा पुरवते. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपन्यांना चार्ज करते.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट या सुविधेतून कंपनी पैसा कमावते. हे फिचर गुगल पे आणि फोन पे सारखे युपीआय सुविधा पुरवते. भविष्यात व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या अॅपमध्ये जाहिराती सुद्धा आणण्याचा विचार करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक-इस्टाग्राम हे तिन्ही प्लॅटफॉर्म मेटाने एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याद्वारे ग्राहकांना विविध सेवा देण्यास सोपे जाते. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस मध्ये भविष्यात पेड सबस्क्रिप्शनही येऊ शकते.