Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railways: आता EMI वर ईशान्येतील 5 राज्यांचा प्रवास घडवणार 'भारत गौरव ट्रेन'

Bharat Gaurav Train

Image Source : www.traveltradejournal.com

Bharat Gaurav Train: भारतीय रेल्वे प्रवाशांना भारत गौरव डीलस्क टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना भेट देण्याची संधी देत आहे. हा प्रवास 21 मार्चपासून सुरु होईल. या सहलीमध्ये कोणत्या राज्यांना भेट देता येईल? साधारण तिकीट किती असेल, अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वेने (IRCTC) प्रवाशांसाठी एक उत्तम टूर पॅकेज सादर केले आहे. रेल्वे प्रवाशांना भारत गौरव डीलस्क टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना भेट देण्याची संधी देणार आहे. ही ट्रेन 21 मार्चपासून दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार ही ट्रेन ईशान्येकडील 5 राज्यांची सफर प्रवाशांना घडवणार आहे. या अंतर्गत आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश या सहलीमध्ये करण्यात आला आहे. ही सहल एकूण 15 दिवसांची असेल, ज्यामध्ये प्रसिद्ध ठिकाणे कव्हर करण्यात येतील.  

भारतीय रेल्वेने 'भारत गौरव योजनेची' (Bharat Gaurav Yojana) सुरूवात 2021 मध्ये केली. या अंतर्गत भारतातील सर्व धार्मिक आणि प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या जातात. देशांतर्गत प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत गौरव ट्रेन अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत (Ek Bharat Shreshtha Bharat) आणि 'देखो अपना देश (Dekho Apna Desh)' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

'या' ठिकाणची सफर घडवणार भारत गौरव ट्रेन

ईशान्येकडील या सहलीचे नाव "नॉर्थ ईस्ट डिस्कवरी: ​बीयॉन्ड गुवाहटी (Northeast Discovery: Beyond Guwahati)" असे देण्यात आले आहे. या ट्रेनचा प्रवास 21 मार्च 2023 रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल आणि गुवाहाटी, शिवसागर, आसाममधील जोर्हट, काझीरंगा आणि यूनाकोटी, त्रिपुरामधील आगरतळा आणि उदयपूर, नागालँडमधील दिमापूर, कोहिमा, शिलाँग आणि चेरीपुंजी या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

या ठिकाणांहून ट्रेन पकडता येईल

तुम्हालाही या सहलीचा भाग व्हायचे असेल, तर तुम्ही दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, टुंडला, इटावा, कानपूर, लखनऊ आणि वाराणसी या स्टेशनवरु बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग करू शकता. प्रवासी या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता किंवा इथे उतरू शकतात.

सहलीसाठी किती खर्च येईल?

ही सहल प्रवाशांना भारत गौरव ट्रेनमधून करता येणार आहे. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये 156 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. 14 रात्री 15 दिवसांच्या या सहलीत  प्रवाशांना जेवण आणि नाष्टा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय मिनी लायब्ररी, सुरक्षा रक्षक, कॅब, गाईड आणि राहण्यासाठी हॉटेलची सुविधाही पुरवली  जाणार आहे.

या प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट एका व्यक्तीला 1,06,990 रुपयांपासून सुरू होत आहे. फर्स्ट क्लास एसीच्या तिकिटासाठी एका व्यक्तीला 1,31,990 रुपये मोजावे लागतील. तसेच एसी 1 कूपसाठी एका व्यक्तीला 1,49,290 रुपये आकारले जाणार आहेत.

EMI पर्यायही उपलब्ध

प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला सहलीला जाता यावे, या उद्देशाने टूर पॅकेज अंतर्गत ईएमआयचा (EMI) पर्याय देण्यात आला आहे. यासाठी IRCTC ने Paytm आणि Razorpay पेमेंट गेटवेशी करार केला आहे. एकूण टूर पॅकेजचा मासिक स्वरूपात एक निश्चित ईएमआय ठरवला जाईल. जो सर्वसामान्य व्यक्तीला भरता येणे सहज शक्य आहे. हल्ली अनेक बँका ट्रॅव्हल लोन देत आहेत.