सध्या भारतात अनेक स्मार्टफोन मोबाईल कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नथिंग फोन (Nothing Phone). या कंपनीचे स्मार्टफोन नवनवीन फीचर्समुळे चांगलेच चर्चेत आहेत. या स्मार्टफोनला लोकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे. या कंपनीचा 'नथिंग फोन 2' हे नवीन मॉडेल लवकरच भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीचे सीईओ कार्ल पेई (CEO Carl Pei) यांनी हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, याची माहिती दिली आहे.
त्यासोबतच या फोनची प्री ऑर्डर ऑनलाईन रिटेल शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरू करण्यात आली आहे. ज्यावर ग्राहकांना कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानिमित्ताने हा फोन भारतात कधी लॉन्च होणार आणि प्री बुकिंग ऑर्डरवर किती डिस्काऊंट मिळणार, जाणून घेऊयात.
फीचर्स जाणून घ्या
नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) मध्ये ग्राहकांना वायरलेस चार्जिंग आणि वॉटर रेजिस्टन्सची सुविधा दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये ए-वन डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत फिंगरप्रिंट्स स्कॅनर दिला गेला आहे.
या फोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा असून 120Hz Amoled स्किन देण्यात आली आहे. यामध्ये ड्यूअल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. याचा 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाईड लेन्स कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नथिंग फोन 2 कधी लॉन्च होणार?
'नथिंग फोन 2' (Nothing Phone 2) हे नवे मॉडेल भारतात 11 जुलै 2023 रोजी लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ कार्ल पेई (CEO Carl Pei) यांनी दिली आहे. सध्या या फोनची प्री ऑर्डर बुकिंग फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरू झाली आहे.
प्री ऑर्डर आणि डिस्काऊंटबद्दल जाणून घ्या
नथिंग फोन 2 च्या प्री ऑर्डरला सिक्योर करण्यासाठी ग्राहकांना 2000 रुपये रिफंडेबल अकाउंट जमा करावी लागेल. 11 जुलै ते 20 जुलै यादरम्यान ग्राहक फ्लिपकार्टवरून आपली ऑर्डर सिक्योर करू शकतात. पूर्ण रक्कम भरून ग्राहक हा फोन प्री बुक करू शकतात. याशिवाय ऑर्डर कॅन्सल करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
या प्री ऑर्डरवर ग्राहकांना नथिंग फोन एक्सेसरिज पॅकेज मिळणार आहे.ज्यावर 50 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. यासोबतच वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्समधून कॅशबॅकची सुविधा देखील मिळणार आहे.
Source: indianexpress.com