सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या सक्रिय आहेत. ज्यामध्ये सॅमसंग (Samsung), नोकिया (Nokia), रियलमी (Realme), शाओमी (Xiaomi), ओपो (Oppo), विवो (Vivo) यांसह नथिंग (Nothing) ही कंपनी देखील नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. भारतीय बाजारपेठेत नथिंग कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) 11 जुलै 2023 रोजी लॉन्च केला. या फोनमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिलेले आहेत. कंपनीने हा फोन 2 स्टोरेज ऑप्शनसह उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या फोनचे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
सध्या या फोनची सगळीकडे चर्चा आहे. काल पासून म्हणजेच 21 जुलै 2023 पासून हा फोन ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत 54,999 निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या फोनच्या खरेदीवर 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, जाणून घ्या.
8000 रुपयांचा डिस्काउंट कसा मिळेल?
ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर नथिंग फोन 2 च्या खरेदीवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. फ्लिपकार्टवर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 49,999 रुपये आहे. या फोनच्या किंमतीवर फ्लिपकार्टकडून 10 टक्क्यांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून हा फोन ग्राहकांना 44,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना अनेक बँक ऑफर्सचा लाभ देखील घेता येणार आहे. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून किंवा डेबिट कार्डवरून या फोनची खरेदी केली, तर ग्राहकांना त्वरित 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून या फोनची खरेदी ईएमआय स्वरूपात केली, तर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून किंवा डेबिट कार्डवरून ग्राहकांनी हा फोन खरेदी केला, तर त्यांना त्वरित 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
ग्राहकांनी यापैकी एका जरी कार्डवरून फोनची खरेदी केली, तर त्यांना 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. 44,999 रुपयांच्या फोनच्या किमतीतून 3000 रुपयांचा डिस्काउंट वजा केला, तर हा फोन ग्राहकांना 41,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याचा अर्थ ग्राहकांना 8000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
फीचर्स जाणून घ्या
नथिंग फोन 2 मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या समोरील आणि मागील बाजूस गोरिला ग्लास (Gorilla Glass) देण्यात आली आहे. जी स्क्रच रेझिस्टन्स फीचर्स सोबत मिळणार आहेत.
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+1 चा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन android 13 वर आधारित असून OS 2.0 यामध्ये देण्यात आला आहे.
या फोनची बॅटरी 4700mAh क्षमतेची असून तिला चार्ज करण्यासाठी 33W चा चार्जर देण्यात आला आहे. हा फोनचे उत्पादन तामिळनाडू राज्यातील प्लांटमध्ये केले जात आहे.
Nothing phone 2 मध्ये रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP Sony IMX890 + 50MP Samsung JN1 सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीने हा फोन तीन व्हेरियंटमध्ये म्हणजेच तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज, 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेज असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.