Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nothing Earbuds 2 Launch: 'या' शॉपिंग वेबसाईटवर नथिंग इअरबड्स 2 खरेदी करता येणार! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Nothing Earbuds 2 Launch

Nothing Earbuds 2 Launch: नथिंग (Nothing) कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स लॉन्च केले आहेत. या इअरबड्समध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले असून ते ब्लॅक रंगात उपलब्ध करून दिले आहेत. हे इअरबड्स ग्राहकांना कुठून आणि किती रुपयांना खरेदी करता येतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सचे इअरबड्स विक्रीसाठी उपलब्ध  आहेत. मात्र सर्वोत्तम क्वालिटी आणि प्रीमियम लुक देणारे नवीन इअरबड्स नथिंग (Nothing) कंपनीने लॉन्च केले आहेत. या इअरबड्सचे नाव 'Nothing Earbuds 2' असे आहे. कंपनीने हे इअरबड्स नवीन कलरमध्ये लॉन्च केले असून यामध्ये हाय रिझोल्यूशन ऑडिओ सपोर्ट मिळणार आहे. हे नवीन इअरबड्स नथिंग एक्स अ‍ॅपशी (Nothing X App) कनेक्ट केले जाऊ शकते. कंपनीच्या या नवीन इअरबड्समध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आले आहेत आणि हे इअरबड्स कुठून व किती रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘Nothing Earbuds 2’ चे फीचर्स जाणून घ्या

Nothing Earbuds 2 हे प्रीमियम ब्लॅक (Black) रंगात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यापूर्वी ते पांढऱ्या (White) रंगात उपलब्ध होते.

Nothing Earbuds 2 मध्ये कंपनीने पॉवरफुल बास आणि क्लियर व्हॉइस करिता 11.6mm कस्टम ड्राइव्ह देण्यात आला आहे. तसेच कोणतेही डिव्हाईस स्विच करण्यासाठी ड्यूल कनेक्शन देण्यात आले आहे.

या इअरबड्समध्ये तुम्हाला साउंड प्रोफाईल, सर्वोत्तम विंड प्रूफ आणि क्राउड प्रूफ क्लिअर व्हॉइस टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. याशिवाय यात नवीन इक्कलायजर देण्यात आला आहे.

हा इअरबड वापरकर्त्याला Nothing X App शी कनेक्ट करून वापरता येईल. त्यासोबत ‘Nothing X App’ ची QR Code प्रोफाईल दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करता येणार आहे. दुसरा व्यक्ती तिला डाउनलोड देखील करू शकतो.

Nothing X App च्या मदतीने वापरकर्ते Nothing Earbuds 2 मध्ये नॉईस रिडक्शन ऍक्सेस करू शकणार आहेत.

इथून खरेदी करता येईल 

Nothing Earbuds 2 ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट Amazon वरून खरेदी करता येईल. याची किंमत 9,999 रुपये असणार आहे. 21 जुलै 2023 पासून या इअरबड्सची विक्री चालू होणार आहे. Amazon शिवाय हे इअरबड्स निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्राहक Nothing Earbuds 2 ची प्री ऑर्डर बुकिंग करू शकतात. ही बुकिंग 11 जुलै ते 20 जुलै दरम्यान करता येईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ही सेवा देण्यात येत आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com