Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deadline for Nomination Extended: सेबीचा गुंतवणूकदारांना दिलासा! नॉमिनेशन अपडेशनसाठी आणखी 6 महिन्यांची मुदत

Demat Account Nomination

Deadline for Nomination Extended:शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनेशन (वारसदाराची माहिती) सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने नॉमिनेशन अपडेशनसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनेशन (वारसदाराची माहिती) सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने नॉमिनेशन अपडेशनसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. दुसऱ्यांदा सेबीने नॉमिनेशनसाठी अतिरिक्त कालावधी दिला आहे.

शेअर ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी सेबीने नॉमिनेशनचा तपशील देणे बंधनकारक केले आहे. मात्र अद्याप कोट्यवधी गुंतवणूकदारांनी ही माहिती सादर केलेला नाही.मागील वर्षभरापासून महिन्यांपासून नॉमिनेशनची प्रक्रिया स्टॉक ब्रोकर्सकडून राबवण्यात येत आहे. आता सेबीने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यासाठी नॉमिनेशचा तपशील सादर करण्यास 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे.

नॉमिनेशन अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. सेबीकडे नोंदणी असलेल्या अपस्टॉक्स, झिरोधा, अॅंजेल वन, शेअरखान, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस, सॅमको यासारख्या बड्या ब्रोकर्स कंपन्यांनी त्यांच्याकडील गुंतवणूकदारांना नॉमिनेशनचा तपशील ऑनलाईन सादर करण्याची व्यवस्था केली आहे. नॉमिनेशन सादर करताना गुंतवणूकदाराला ज्या व्यक्तीला खात्याचा वारसदार म्हणून निवडणार आहे अशा व्यक्तीचे ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. नॉमिनेशनची प्रोसेस ऑनलाईन होणार असून गुंतवणूकदाराच्या आधार क्रमांकाचे व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. त्यामुळे आधार कार्ड अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. एका डिमॅट अकाउंटसाठी जास्तीत जास्त तीन व्यक्तींना नॉमिनी म्हणून ठेवता येऊ शकते. त्यांना किती टक्के हिस्सा द्यायचा हे गुंतवणूकदाराला ठरवायचे आहे.



ब्रोकर्स कंपन्यांच्या अंदाजानुसार भारतातील निम्म्याहून अधिक डिमॅट खातेधारकांनी अद्याप नॉमिनीचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे सेबीने या प्रोसेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती.यापूर्वी 31 मार्च 2022 पर्यंत नॉमिनेशन सादर करण्याची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यावेळी सेबीने वर्षभरासाठी मुदत वाढवली होती.

भारतात 11 कोटी डिमॅट अकाउंट

शेअर मार्केटमधील तेजीने सामान्यांच्या मनात आकर्षण निर्माण केले आहे. अल्प कालावधीत चांगला फायदा मिळत असल्याची अनेक उदाहरणे पाहिल्यानंतर तरुणाई देखील शेअर मार्केटमध्ये आपले नशीब आजमावत आहे. एका अभ्यासानुसार भारतात 11 कोटी डिमॅट खाती आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनुसार वर्ष 2022 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या 31% ने वाढून 11 कोटी इतकी झाली. जानेवारी 2021 मध्ये भारतात 8.4 कोटी डिमॅट खाती होती.

(News Source : ET)