स्मार्टफोन बाजारापेठेत सध्या 5G फोनची चलती आहे. सॅमसंग, रिअलमी, शाओमी या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आता नोकिया कंपनीने कंबर कसली आहे. नोकिया G52 5G हा स्मार्टफोन आजपासून भारतात ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉनवर Nokia G42 5G ची विक्री सुरु झाली आहे. 5G श्रेणीत सर्वोत्तम फिचर्स देणाऱ्या या मोबाईलची किंमत 12599 रुपये इतकी आहे.
Nokia G42 5G या स्मार्टफोनचे 11 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच झाला होता. आज 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर या फोनची विक्री सुरु करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नोकियाकडून या 5G फोनबाबत जोरदार प्रमोशन करण्यात आले होते.
Nokia G42 5G फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. यात 480 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम आणि 5000 mAh बॅटरी आहे. या फोनची किंमत 12599 रुपये आहे. 5G मोबाईलच्या श्रेणीत नोकियाकडून बेस्ट फिचर्स देण्यात आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Nokia G42 5G फोनमध्ये देण्यात आलेला स्नॅपड्रॅगन 480 आणि एसओसी नोकिया G42 प्रोसेसर हा ग्राहकांना गतिमान प्रोसेसिंगचा अनुभव देईल. याशिवाय या फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून त्याला गोरिला ग्लासचे आवरण देण्यात आले आहे. त्यामुळे फोन आणखी सुरक्षित झाला आहे.
डेटा स्टोरेजच्या दृष्टीने नोकियाने G42 5G फोनची खास रचना केली आहे. सध्या Nokia G42 5G फोनचे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचे मॉडेल उपलब्ध आहे. यात ग्राहकाला इंटर्नल मेमरी 11 जीबी रॅमपर्यंत एक्सटेंड करता येईल. ज्यामुळे फोनमध्ये लार्ज फाईल्सचा डेटा ठेवणे शक्य होणार आहे.
या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केलेला फोन किमान 3 दिवस कार्यरत राहू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. फोनसोबत ग्राहकाला 20w चार्जर देण्यात आला. बॅटरी आणि चार्जरची क्षमता बघता 15000 रुपयांखालील 5G फोनच्या श्रेणीत Nokia G42 5G ने दावेदारी मजबूत केली आहे.
Nokia G42 5G या फोनमध्ये कंपनीने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या दृष्टीने चांगला टेक्वनिकल सपोर्ट दिला आहे. कंपनीने 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सॉर, 8 एमपी फ्रंट कॅमेरा दिला आहे. ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअपमुळे फोटो, सेल्फिज आणि व्हिडिओ शूट करणे सोपे जाणार आहे.