भारतात रेल्वेचे मोठ्या प्रमाणात जाळे आहे. अनेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंद करतात. अनेकदा तिकीट कन्फर्म नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट आणि जागा सहजरित्या मिळावी यासाठी रेल्वे एक विशेष सुविधा प्रदान करत आहेत. या सेवेमुळे आतापासून तुम्हाला जनरल तिकिटावर ट्रेनमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Table of contents [Show]
रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
रेल्वेने अनारक्षित जनरल तिकीट बुक करण्यासाठी खास ऍप लाँच केले आहे. त्यामुळे प्रवाशांना आतापासून तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. अनेक वेळा तिकीट काउंटरच्या कमी संख्येमुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, मात्र आतापासून तुमची अडचण दूर होणार आहे.
तुम्ही नोंदणी कशी करू शकता?
UTS App नावाचे ऍप तुम्ही तुमच्या फोनवर डाउनलोड करू शकता. यानंतर तुम्ही त्यावर नोंदणी करू शकता. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इतर सर्व तपशील नोंदणी करताना भरावे लागतील. आता यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो तुम्हाला भरावा लागेल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तुमची अधिकृत नोंदणी केली जाईल.
???? ?? ??? ????? ?? ???? ??? ??? "????? ??????"?#Utsapp #DigitalIndia #godigital #MobileApp #mobiletkt@RailMinIndia @Central_Railway @drmmumbaicr @_DigitalIndia @YatriRailways pic.twitter.com/txjyr34yav
— Sr DCM, Mumbai, CR (@srdcmmumbaicr) January 30, 2023
तिकीट बुकिंगवर मिळेल बोनस!
जर तुम्ही या ऍपद्वारे ट्रेनचे तिकीट बुक केले तर तुम्हाला बोनस देखील मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला 15 रुपयांऐवजी फक्त 30 रुपये खर्च करावे लागतील. या ऍपद्वारे तुम्ही स्वस्तात तिकीट बुक करू शकता. यासाठी तुम्हाला आर वॉलेटमधून (R Wallet) पैसे द्यावे लागतील.
जनरल तिकिट बुक करण्याचे महत्त्वाचे नियम
जनरल तिकिटाच्या नियमांबद्दल बोलायचे झाले तर ते दोन भागात विभागले आहे. प्रवासाची वेळ आणि प्रवासाचे अंतर या दोन गोष्टी मोबाईलद्वारे तिकीट बुक करताना महत्वाच्या आहेत. जर एखाद्याला ट्रेनने 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर तिकिटाचा नियम असा आहे की त्याने तिकीट खरेदी केल्यानंतर 180 मिनिटांच्या आत ट्रेनमध्ये चढले पाहिजे. दुसरीकडे, जर एखाद्याला 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करायचा असेल तर त्यांनी 3 दिवस अगोदर जनरल डब्याचे तिकीट काढणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेनसाठी ही सुविधा अगोदरच सुरु करण्यात आली आहे. अनेकांना या सुविधेचा फायदा होत आहे. आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य नागरीकांचा प्रवास सुखकर होणार आहे.