Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New leave encashment rule: खाजगी कर्मचार्‍यांच्या रजा रोखीकरणाबाबत नवीन नियम काय सांगतो? जाणून घ्या

New Leave Encashment Rule

New leave encashment rule: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रजा रोखीकरणावरील (Leave Encashment) कर सवलत 3 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना याचा फायदा कसा होणार, हे समजून घ्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चं बजेट संसदेत मांडलं. यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांना (Private Employee) दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली. त्या घोषणेनुसार रजा रोखीकरणावरील (Leave Encashment) कर सवलत 3 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

याचा सोपा अर्थ असा की, जर तुमची रजा रोख (Leave Encashment) रक्कम 25 लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्यास तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र ही गोष्ट नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करण्यात येईल. पण रजा रोखीकरण म्हणजे काय?, रजा रोखीकरणाचा नवीन नियम नक्की काय आहे? कोणती सवलत खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यासारख्या अनेक गोष्टी जाणून घ्या.

रजा रोखीकरण (Leave Encashment) म्हणजे काय?

प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही सुट्ट्या देते. देण्यात आलेल्या सुट्ट्यांपैकी काही सुट्ट्या जर कर्मचाऱ्याने घेतल्या नाहीत, तर त्याबदल्यात त्याला पैसे मिळतात . त्याला रजा रोखीकरण (Leave Encashment) असं म्हणतात.

प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पगार पत्रकानुसार (Salary Structure) त्याला वर्षभरात किती सुट्ट्या (leave) मिळतील याची पूर्णता कल्पना देण्यात आलेली असते. याशिवाय सुट्ट्या नाही घेतल्या तर, त्याबदल्यात पैसे मिळतील ही माहिती देखील देण्यात येते. जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हाला ही गोष्ट ठाऊक असणे गरजेचे आहे.  

कोणत्या सुट्ट्या रजा रोखीकरण (Leave Encashment) स्वरूपात मिळतात?

खाजगी क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या देतात . यामध्ये आजारी रजा (Sick Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), अर्जित रजा (Earned Leave) आणि विशेषाधिकार (Privilege leave) यांचा समावेश करण्यात आलेला असतो.

यापैकी, जर तुम्ही संपूर्ण वर्षात आजारी रजा आणि आकस्मिक रजा वापरली नाही तर ती लॅप्स होते, म्हणजेच संपते. मात्र अर्जित रजा (EL) आणि विशेषाधिकार रजेच्या (PL) बदल्यात पैसे मिळतात. म्हणजेच तुम्ही त्यांना रजा रोखीकरण (Leave Encashment) स्वरूपात प्राप्त करू शकता.

रजा रोखीकरणाचा (Leave Encashment) नियम काय सांगतो?

प्रत्येक राज्याच्या रजा रोखीकरणाचा (Leave Encashment) नियम हा वेगवेगळा आहे. महाराष्ट्रात हा नियम 'महाराष्ट्र शॉप ऍक्ट (Maharashtra Shop Act’ या नावाने रुजू करण्यात आला असून या अंतर्गत अनेक कायदे आहेत. रजा रोखीकरणा (Leave Encashment) संदर्भात प्रत्येक खाजगी कंपनीतील नियम हे वेगवेगळे आहेत.

कर्मचारी कंपनी सोडताना कंपनी त्याच्या शिल्लक सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे देते. कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 10 महिन्यांचा पगार जितका असेल, त्यावर आधारित रजा रोखीकरण (Leave Encashment) करण्यात येते.

तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र शॉप कायद्यानुसार जर कर्मचारी त्याच्या सिनिअर व्यक्तीकडे किंवा बॉसकडे सुट्टी मागणीसाठी गेला आणि अतिरिक्त काम असल्याने जर, ती सुट्टी नाकारण्यात आली, तर तो दिवस रजा रोखीकरण (Leave Encashment) स्वरूपात दिला जाऊ शकतो. रजा रोखीकरण (Leave Encashment) करताना ग्रॉस स्लरीनुसार पगार गणला जावा. मात्र बऱ्याच कंपन्या या त्यांच्या पॉलिसीनुसार बेसिक सॅलरीवर रजा रोखीकरण (Leave Encashment)करतात.

निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये काय म्हटलं?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "खाजगी कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर किंवा कंपनी सोडल्यानंतर रजा रोखीकरणावर (Leave Encashment) वाढीव कर सवलत दिली जाणार आहे. जुनी 3 लाखांची मर्यादा 2002 मध्ये निश्चित करण्यात आली होती. जी आता वाढवून 25 लाख रुपये वाढवण्यात येणार आहे".

आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (10AA) (ii) अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती नोकरी करत असताना सुट्ट्यांचा लाभ रोख पगाराच्या स्वरूपात घेत असल्यास, त्याला पगाराचा भाग मानला जाईल.

याचा साधा सोपा अर्थ असा की, ज्या व्यक्तीच्या शिक्कल सुट्ट्या रजा रोखीकरण करताना 25 लाख रुपयांपर्यंत जातील, त्यावर कोणाही कर लागणार नाही. 25 लाखाहून जास्त रकमेवर कर आकारण्यात येईल. रजा रोखीकरण अंतर्गत मिळालेल्या रकमेवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 89 अंतर्गत कर सवलतीचा दावा केला जाऊ शकतो.

रजा रोखीकरणाचे गणित समजून घ्या

अर्थसंकल्पात प्रस्तावित मर्यादा 3 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात.

एक व्यक्ती 15 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे. त्या व्यक्तीला कंपनीकडून वर्षाला 35 दिवसांच्या सशुल्क रजा मिळतं होत्या, म्हणजे त्यांच्या संपूर्ण 15 वर्षाच्या सेवेदरम्यान त्याला एकूण 525 दिवसांची रजा मिळाली. (35 रजा X 15 वर्ष= एकूण रजा )

यापैकी, त्या व्यक्तीने आधीच 200 दिवसांची सशुल्क रजा वापरली आहे आणि 325 दिवसांची न वापरलेली रजा त्याच्याकडे शिल्लक आहे. त्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या वेळी मूळ पगार(Basic Salary ) + 33,000 रुपये प्रति महिना DA आणि उर्वरित 325 दिवसांच्या आधारे गणना केलेल्या रजा रोखीकरण (Leave Encashment) म्हणून 3,57,500 रुपये मिळतील. (यामध्ये दररोज पगार 33,000/30 दिवस= 1100 रुपये दर दिवसा पकडले जातील).