Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Driving License Rules: नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहेत? नियमात झाले मोठे बदल, पाहा डिटेल्स

Driving License

Image Source : https://www.freepik.com/

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स सोप्या पद्धतीने काढता यावे यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अनेक चक्करा माराव्या लागतात. तसेच, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही.नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स सोप्या पद्धतीने काढता यावे यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत. तसेच, दंड व शुल्कामध्येही बदल करण्यात आले आहेत. तुम्ही देखील ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या नियमांबाबत जाणून घ्या.

1 जूनपासून लागू होणार नवीन नियम

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी वाहनचालकांना आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. वाहनचालक सरकारद्वारे मान्यताप्राप्त खासगी संस्था अथवा ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स काढू शकतात. याशिवाय, दुचाकी व चारचाकी वाहनानुसार ठराविक कागदपत्रेच लायसन्स काढताना सादर करावी लागतील.

नवीन नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स देणाऱ्या खासगी संस्थेकडे 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्यास 2 एकर जमीन असावी. प्रशिक्षक किमान हायस्कूल डिप्लोमा असावा. त्याला 5 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव व इतर तांत्रिक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. 

हलके मोटार वाहनाचे (LMV)  लायसन्स काढण्यासाठी 4 आठवड्यात 29 तासांचे, तर जड मोटार वाहनाचे (HMV) लायसन्स काढण्यासाठी 6 आठवड्यात 38 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या शुल्कात बदल

नवीन नियमासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या शुल्कात देखील बदल करण्यात आले आहेत. 1 जूनपासून लायसन्स काढण्यासाठीचे शुल्क पुढील प्रमाणे असेल.

  • शिकाऊ लायसन्स - 200 रुपये
  • ड्रायव्हिंग टेस्ट - 300 रुपये
  • शिकाऊ लायसन्स नुतनीकरण - 200 रुपये
  • आंतरराष्ट्रीय लायसन्स - 1000 रुपये
  • कायमस्वरुपी लायसन्स - 200 रुपये
  • कायमस्वरुपी लायसन्स नुतनीकरण - 200 रुपये
  • नुतनीकरण लायसन्स जारी करण्यासाठी - 200 रुपये

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कसा करू शकता अर्ज?

  • ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अथवा नुतनीकरणासाठी https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल.
    त्यानंतर राहत असलेले राज्य निवडा.
  • त्यानंतर तुमचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, जन्मतारखेसह इतर खासगी माहिती द्यावी लागेल.
  • अर्ज भरल्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठीची तारीख निवडा. 
  • त्यानंतर निवडलेल्या तारखेला आरटीओ अथवा खासगी संस्थेत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता.

नियम मोडल्यास दंड 

वाहनचालकांना प्रशिक्षण न देताना लायसन्स जारी केल्यास अशा संस्थांकडून 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. लायसन्सशिवाय व वेगाने गाडी चालणाऱ्यांकडून 1 ते 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल व अल्पवयीन चालकाला वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यावरच नवीन ड्रायव्हिंग लायन्स दिले जाईल.