Netflix Rules Regarding Password Sharing: नेटफ्लिक्स कंपनीला होत असलेल्या सततच्या तोट्यामुळे कंपनीने पासवर्ड शेअरिंग बंद केले आहे. नेटफ्लिक्सने यूजर्सला ईमेल पाठवून ही माहिती दिली आहे. यापुढे तुम्ही जर का एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर समान Netflix खाते वापरत असाल्यास किंवा ते मित्रांसोबत शेअर करत असल्यास, तुम्हाला एक ईमेल मिळेल. तसेच एकच सबस्क्रिप्शन अनेक लोक वापरत असल्यास, दर सात दिवसांनी कोडद्वारे पडताळणी केली जाईल. याशिवाय मुख्य म्हणजेच प्रथमिक खात्याचे वाय-फाय नेटवर्क 31 दिवसांतून एकदा तरी कनेक्ट करावे लागेल.
सबस्क्रिप्शन पडताळणी होणार
यापुढे एकाच घरातील एकच नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन अनेक लोक वापरु शकणार नाहीत. वापरकर्ते घरातील केवळ एकाच व्यक्ती बरोबर आपला पासवर्ड शेअर करु शकणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एकच नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन एकाच घरातील नातेवाईक किंवा मित्र वापरु शकणार नाहीत. याची पडताळणी कंपनीकडून आयपी अॅड्रेस, डिव्हाइस आयडी, नेटवर्क, इत्यादी द्वारे केली जाईल.
कंपनीचा होईल फायदा
नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे भारतात नेटफ्लिक्स प्रेमींमध्ये नक्की खळबळ माजणार आहे. पण जे याशिवाय राहू शकत नाहीत त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत कंपनीचे सक्रिय सदस्य वाढतील आणि महसूलही वाढेल. भारतात Netflix प्लॅनची सुरुवातीची किंमत 149 रुपये आहे आणि टॉप प्लॅनची किंमत 649 रुपये आहे. पासवर्ड शेअर न करण्याच्या नियमामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मेक्सिको आणि ब्राझील या देशांची नावे आहेत.