Market Bull Nemish Shah: एनम होल्डिंग्जचे (ENAM Holding) सह-संस्थापक आणि संचालक नेमिश शाह हे भारतातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. सध्याच्या अंदाजानुसार नेमिश शाह यांच्याकडे असलेल्या 7 शेअर्समधील नफा 1,067.6 कोटी रुपये इतका आहे. नेमिश शाह हे आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Nemish Shah, Director & CEO, ICICI Prudential Mutual Fund) म्हणूनही ओळखले जातात. भारतातील सर्वांत प्रसिद्ध इन्वेस्टर्सपैकी एक इन्व्हेस्टर नेमिश शाह. ज्यांनी भारतातील सर्वांत मोठी माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसला सार्वजनिक केले होते. भारतीय शेअर मार्केटमधील जादूगार निमेश शाह (Nimesh Shah) आहेत आपले आजचे मार्केट बुल (Markt Bull).
Table of contents [Show]
कोण आहेत नेमिश शाह!
नेमिश शाह हे एक उत्कृष्ट गुंतवणूकदार आहेत; ज्यांनी 1977 मध्ये मुंबईतील लाला लजपतराय कॉलेजमधून B.com पूर्ण केले. ते ENAM होल्डिंग्ज या खाजगी मालकीच्या आणि व्यवस्थापित इन्व्हेस्टमेंट हाऊसचे संचालक आणि सह-संस्थापक आहेत. शाह नव्या कंपन्यांपेक्षा जुन्या पारंपारिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी मार्केटमधील अव्वल गुंतवणूकदार, रिस्क घेण्याकरिता आणि त्यांच्या अचूक निर्णयांकरिता प्रसिध्द आहेत.
इन्फोसिस आणि शाह
1993 मध्ये ENAM द्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी, Infosys ला पब्लिक लिस्टेड करण्यात आले. लिस्टिंग दरम्यान Infosys चे शेअर्स पडत असताना ENAM चे सह-संस्थापक नेमिश शाह आणि वल्लभ भन्साळी यांनी गुंतवणूकदारांना इन्फोसिसमध्ये गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
ENAM काय आहे?
1984 मध्ये नेमिश शाह यांनी स्वत:चे स्टॉक व्हेंचर सुरू केले आणि त्याचवेळी त्यांनी ENAM होल्डिंग कंपनीची स्थापना देखील केली होती. त्यानंतर काही वर्षात त्यांनी बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आणि 6 महिन्यातच ते गुंतवणूक बँकांच्या यादीत आले. सुरुवातीला, ENAM ही एक ब्रोकिंग कंपनी होती. ती लवकरच बँकिंग व्यवसायात उतरली. या सर्व घडामोडींमध्ये ENAM ने गुंतवणुकीच्या संशोधनाला त्याचा कणा मानला. 2010 मध्ये ENAM ने तिचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ब्रोकिंग ऑपरेशन्स Axis Bank मध्ये 2,067 कोटी रुपयांच्या व्यवहारात विलीन केले. सध्या नेमिश शाह हे फर्मच्या ट्रेझरी ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करतात आणि ENAM होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कंपनीचे भांडवल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
नेमिश शाह यांचा मार्केट मंत्र
शाह यांच्या मते प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीतील काही गोष्टींची पडताळणी करावी. जसे की,
- कंपनीचा ROCE (Return on Capital Employed) 9% पेक्षा कमी नसावा.
- कंपनीने भविष्यातील ग्रोथबाबत नियोजन केलेले असावे.
- कंपनीची मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी योग्य असावी.
Trendlyne ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, Nemish Shah यांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये 7 स्टॉक्स आहेत; ज्यांची एकूण संपत्ती 1,260.9 कोटी रुपये आहे. त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे.
- लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेड (Lakshmi Machine Works Ltd) (954.4 कोटी रुपये)
- एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेड (Elgi Equipments Ltd) (119.4 कोटी रुपये)
- EID पॅरी इंडिया लिमिटेड (EID Parry India LTd) (103.8 कोटी रुपये)
- बन्नरी अम्मान शुगर्स लिमिटेड (Bannari Amman Sugars Ltd) (75.6 कोटी रुपये)
- झोडियाक क्लोदिंग कंपनी लिमिटेड (Zodiac Clothing Company Ltd) (4.9 कोटी रुपये)
- राणे इंजिन व्हॉल्व्ह लिमिटेड (Rane Engine Valve Ltd) (1.9 कोटी रुपये)
- सुपर स्पिनिंग मिल्स लिमिटेड (Super Spinning Mills Ltd) (1 कोटी रुपये)
त्यांच्या या पोर्टफोलिओवरून हे अगदी स्पष्ट आहे की, त्यांना मोठ्या प्रमाणात स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे आवडत नाही. त्याऐवजी ते काही निवडक स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातच विविधता आणण्याचा प्रयत्न करतात.