Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Pension Scheme गुंतवणूकदारांना Dmat Account वरून बघता येणार नफा-तोटा

National Pension Scheme

NPS च्या सदस्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली जाणार असल्याचे पेन्शन फंड नियामक संस्थेने म्हटले आहे. या अंतर्गत NPS सदस्य आता त्यांच्या एकूण गुंतवणुकीचे डीटेल्स त्यांच्या डीमॅट खात्यावर पाहू शकतील. यासाठी गुंतवणूकदारांना Demat Account सुरु करावे लागणार आहे. NPS खाते डीमॅट खात्याशी संलग्न केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या सद्यस्थितीतील गुंतवणुकीचा तपशील बघता येणार आहे.

तुम्ही जर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) गुंतवणूक केली असेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर किती नफा, किती तोटा तुम्हांला मिळतो आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आता ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे. पेन्शन फंड नियामक PFRDA, आणि SEBI च्या सहकार्याने आता NPS गुंतवणूकदारांना घरबसल्या त्यांच्या गुंतवणुकीचे डीटेल्स बघता येणार आहेत.

कशी बघता येईल गुंतवणूक?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) च्या सदस्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली जाणार असल्याचे पेन्शन फंड नियामक संस्थेने म्हटले आहे. या अंतर्गत NPS सदस्य आता त्यांच्या एकूण गुंतवणुकीचे डीटेल्स त्यांच्या डीमॅट खात्यावर पाहू शकतील. यासाठी गुंतवणूकदारांना Demat Account सुरु करावे लागणार आहे. NPS खाते डीमॅट खात्याशी संलग्न केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या सद्यस्थितीतील गुंतवणुकीचा तपशील बघता येणार आहे. या सुविधेचा फायदा NPS च्या 1.35 कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे.

PFRDA चे परिपत्रक 

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणने (Pension Fund Regulatory and Development Authority) नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, एनपीएस स्टेटमेंट एकत्रित अकाउंट स्टेटमेंट (Consolidated Account Statement) सह संलग्नित केले गेल्याचे म्हटले आहे.

सध्याच्या प्रचलित नियमानुसार NPS मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला त्यांच्या गुंतवणुकीचे स्टेटमेंट वर्षातून एकदा दिले जाते. सोबतच सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (CRA) मध्ये लॉग इन करून गुंतवणुकीचे सद्यस्थितीतील तपशील देखील पाहिले जाऊ शकतात. मात्र सर्वांनाच हे शक्य होत नाही. यामुळे गुंतवणूकदारांची सुविधा लक्षात घेता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

एनपीएस खात्याशी डीमॅट लिंक करण्याची प्रक्रिया


1. NPS सदस्य CRA-Protein च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल (https//npscra.nsdl.co.in/).

2. या वेबसाईटवर खातेदाराला, एकत्रित खाते विवरणची (CAS) लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर 12 अंकी PRAN आणि PAN क्रमांक आणि जन्मतारीख टाका.

3. Declaration फॉर्म सबमिट करा. नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेल आयडीवर मिळालेला पासवर्ड टाका.

4. तुमची नोंदणी प्रक्रिया यशस्वी झाल्याचा संदेश तुम्हांला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

नाममात्र शुल्क 

एकत्रित खाते विवरण (Consolidated Account Statement) द्वारे NPS खात्याचे तपशील प्राप्त करण्यासाठी खातेदारांकडून नाममात्र शुल्क देखील आकारले जाईल असे परिपत्रकात म्हटले आहे. NPS खात्याच्या तपशीलाची पेपर कॉपी जर हवी असेल तर एका पेजसाठी 1 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर ईमेलद्वारे स्टेटमेंट मागवायचे असेल तर  10 पैसे शुल्क आकारले जाईल असे परिपत्रकात म्हटले आहे.