World-Class Station Facility: नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत या रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सेवा प्रवाशांना दिल्या जाणार आहे. पुनर्विकास स्टेशन हे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे. यासाठी एकूण 487.77 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जात आहे. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास आधीच्या हेरिटेज इमारतीला कायम ठेवून करण्यात येणार आहे.
अशा असणार सुविधा
पुनर्विकास रेल्वे स्टेशन हे अत्यंत नवीन- अत्याधूनिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे. यामध्ये एक विशाल रुफ प्लाझा असणार आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी 28 लिफ्ट आणि 31 एस्केलेटर लावल्या जाणार आहे. यात्रेकरुंना ये-जा करतांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी आगमन - निर्गम करण्यास स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे बेसमेंट पार्किंग, वेटिंग एरिया, सीसीटीवी सुविधा असणार आहे. सोबतच स्टेशन दिव्यांग प्रवाशांच्या दृष्टीकोणातून अनुकूल करण्यात येणार आहे. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशन ते मेट्रो स्टेशन, शहर बस स्थानक आणि वाहतुकीच्या इतर साधनांपर्यंत कनेक्टिव्हिटी विकसित केली जाणार आहे.
स्टेशनला येणार ग्रीन बिल्डींगचे स्वरुप
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत रेल्वे स्टेनला ग्रीन बिल्डींग स्वरुपात डिझाइन केले जाणार आहे. यामध्ये सौर ऊर्जा, जलसंधारण यंत्रणा, जलसंवर्धन सुविधा असतील. सद्य परिस्थितीत बौचिंग प्लांट, साइट लॅबचे बांधकाम, यासह इतर काही कार्ये पूर्ण झालेली आहेत. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्पामुळे केवळ प्रवाशांना अत्याधूनिक सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर नागपूर शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यास देखील हा प्रकल्प महत्वाचा ठरेल.