• 28 Nov, 2022 16:14

Housing Sale : मुंबईत बिल्डरांची दिवाळी, सणासुदीत घरांची रेकॉर्डब्रेक विक्री, सरकारी तिजोरीत 700 कोटींचा कर

Mumbai Housing Sale, Real Estate

Mumbai Witness Record Housing Sale : मंदी आणि व्याजदर वाढीने हैराण झालेल्या मुंबईतील रिअल इस्टेटला दिवाळीमध्ये सुगीचे दिवस दिसून आले. मुंबईत दिवाळील तब्बल 8300 हून अधिक प्रॉपर्टींची दस्त नोंदणी झाली असून सरकारला घसघशीत महसूल मिळाला आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळीने सर्वच उद्योग क्षेत्रात तेजी दिसून आली आहे. देशातील महागड्या शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईतील रिअल इस्टेटला देखील यंदाच्या दिवाळीने भरभरुन दिले आहे.ऑक्टोबर महिन्यात स्थावर मालमलत्ता क्षेत्रात 8300 हून अधिक दस्त नोंदणी झाली आहे. यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी ७१७ कोटींचा बंपर महसूल मिळाला आहे.  (Mumbai Witness Record Housing Sale in October 2022 )

महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेने मागील काही महिन्यात व्याजदर वाढवले आहेत. परिणामी बँकांनी देखील गृहकर्जाचे दर वाढवले आहेत. मात्र तरिही मुंबई आणि आसपास परिसरातील घरांची मागणी कायम आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत यंदा हजारो ग्राहकांनी गृहस्वप्न सत्यात उतरवले. ज्यामुळे राज्य सरकारला देखील स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वाधिक कर महसूल मिळाला. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा कर महसुलात 30% वाढ झाली. मुंबईत ऑक्टोबर 2022 या महिन्यात 8358 दस्त नोंद झाली आहे.  

मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या तरी या शहरात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मुंबईत आपले घर असावे अस स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभराची जमा केलेली पुंजी खर्च करणारे ग्राहक आहेत. ऑक्टोबरमधील घरांच्या विक्रीत परवडणारी घरे हा महत्वाचा घटक होता, असे नाईट फ्रॅंक या संस्थेने केलेल्या अहवालात म्हटले आहे. नजीकच्या काळात रिअल इस्टेटमधील तेजी कायम राहील, असा अंदाज नाईट फ्रॅंकने व्यक्त केला आहे.  

अवघ्या 10 महिन्यांत एक लाख घरांची रेकॉर्डब्रेक विक्री

2022 या वर्षातील पहिल्या 10 महिन्यात तब्बल एक लाखांहून अधिक दस्त नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.अशा प्रकारे एक वर्षात 10 लाखांहून अधिक दस्त नोंदणी होण्याची मागील 10 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या दहा महिन्यांच्या काळात मुंबईत 1,03,557 प्रॉपर्टीचे दस्त नोंदणी झाली.यातून सरकारला मुद्रांक शुक्लातून जवळपास 7,300 कोटींचा महसूल मिळाला.

कोरोनानंतर पहिल्यांदाच दिवाळीत बंपर उत्पन्न

मुंबईत ऑक्टोबर 2022 या महिन्यात 8,358 दस्त नोंद झाली आहे. यापूर्वी कोरोना पूर्वी म्हणजे वर्ष 2020 मधील दिवाळीत 9,301 घरांची विक्री झाली होती.  गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा कर महसुलात 30% वाढ झाली. राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी ७१७ कोटींचा बंपर महसूल मिळाला