देशातील नामांकित स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोलाने आज 3 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. 'Motorola Razr 40' आणि 'Motorola Razr 40 Ultra' असे या दोन्ही स्मार्टफोनचे नाव आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन फोल्डेबल आहे. यापूर्वी भारतीय बाजारपेठेत सॅमसंग, ओपो यासारख्या नामांकित कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले होते. मोटोरोला कंपनीचा हा स्मार्टफोन इतर फोनपेक्षा कसा वेगळा आहे, यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत आणि त्याची किंमत किती असेल, याबद्दल जाणून घेऊयात.
'Motorola Razr 40' आणि 'Motorola Razr 40 Ultra' चे फीचर्स जाणून घ्या
'Motorola Razr 40' या फोनमध्ये 6.59 इंचाचा Full HD+ LTPO pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ब्राईटनेस 1000 nits इतका देण्यात आला आहे. या फोनमध्ये Razr 40 Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन android 13 वर चालणार आहे. याची बॅटरी क्षमता 4200mAh असणार आहे. याला चार्ज करण्यासाठी 15W चा वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 64MP चा मेन कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. Motorola Razr 40 हा तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध करून दिला आहे. ज्यात Azure Grey, Cherry Powder आणि Bright Moon White कलर मिळणार आहे.
'Motorola Razr 40 Ultra' या फोनचा डिस्प्ले 6.90 इंचाचा असून यामध्ये FHD + pOLED प्रकारातील डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता 3800mAh आहे. ज्याला चार्ज करण्यासाठी 30W टर्बो चार्जिंग देण्यात आले आहे.
या फोनमध्ये ग्राहकांना 12MP चा मेन कॅमेरा तसेच 13MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आणि सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. Motorola Razr 40 Ultra मध्ये तीन रंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये Fengya Black, Ice Crystal Blue आणि Magenta हे रंग मिळणार आहेत.
किंमत जाणून घ्या
हे दोन्ही स्मार्टफोन ग्राहकांना ॲमेझॉनवरून खरेदी करता येणार आहेत. हा फोन ग्राहकांना 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या Motorola Razr 40 या फोनची किंमत 59,999 रुपये असणार आहे. तर Motorola Razr 40 Ultra या स्मार्टफोनची किंमत 80,000 रुपये असणार आहे.
Source: abplive.com