पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 26 सप्टेंबर 2023 रोजी देशातल्या 51 हजार तरूणांना सरकारी नोकऱ्या देणार आहेत. पंतप्रधान आपल्या हातानी या तरूणांना अपॉइंटमेंट लेटर देणार आहेत.रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी गेले काही महिने तरूणाईच्या हाती काम देत आहेत.
सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी मोदी दिल्लीच्या नॅशनल मिडिया सेंटर इथनं वेगवेगळ्या सरकारी मंत्रालयं आणि संस्थानात नवनियुक्त तरूणांना व्हर्च्युअल माध्यमातून भेटणार आहेत आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर देणार आहेत.
गेल्या काही काळापासून आयोजित केला जातोय रोजगार मेळावा
गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी हा रोजगार मेळावा आयोजित केला गेला होता.त्यातही 51 हजार मुलांना सरकारी नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या.यात प्रमुख्याने CRPF, BSF, SSB,CISF,ITBP,NCB आणि दिल्ली पोलीस यात युवकांना सहभागी करून घेतले होतं.
आजवर 6 लाख लोकांना दिली गेली आहेत नियुक्तीपत्र
28 ऑगस्ट 2023 पर्यंत साधारणपणे सहा लाख युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत. देशात गेल्या काही काळापासून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यात नवनियुक्त कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल माध्यमातून जॉइनिंग किंवा अपॉइंटमेंट पत्र दिली जातात. याच वेळेस या तरूणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधनही करतात. देशातल्या रोजगाराच्या विषयावर या तरूणांकडून मोदी काही इनपुटही घेतात.