Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून करू शकता लाखोंची कमाई

Business Idea

Business Idea: नोकरी सोडून व्यवसायाकडे भारतीयांचा कल वाढत चालला आहे. तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर सुरक्षा एजन्सी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुरक्षा एजन्सीमधून रोजगार निर्मिती बरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याची देखील करू शकता. तसेच, अतिशय कमी जागेत हा व्यवसाय उभारणे शक्य आहे.

अलीकडच्या काळात लोक सुरक्षेविषयी जागृत झाले आहेत. गैरप्रकाराची वाढती प्रकरणे पाहून व्यावसायिक सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत. यामुळे सध्या मॉल, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जात आहे. यामुळे संरक्षण प्रदान करण्याच्या या व्यवसायाला तेजी आली आहे. तुम्हीही हा व्यवसाय उभारण्याचा विचार करत असाल तर यासाठी कुठल्या गोष्टींचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. हे जाणून घेऊ.    

सुरक्षा रक्षकांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इतर क्षेत्रांच्या तुलनेने या व्यवसायात मंदी येण्याची शक्यता फारच कमी आहे. प्रत्येकाला सुरक्षितता हवी आहे. कोणी श्रीमंत असो वा मोठा व्यापारी, तो नेहमी त्याच्या सुरक्षिततेसाठी विश्वसनीय सुरक्षा एजन्सीच्या शोधात असतो. अशावेळी तुम्ही स्वत:ची सुरक्षा एजन्सी सुरू करून या व्यवसायामध्ये चांगला जम बसवू शकता.

सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर किंवा वाढत्या महागाईमुळे काही व्यवसायिक विविध प्रकारच्या खर्चात कपात करत आहेत. पण ते सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाहीत. यामुळे तुम्हाला या व्यवसायात भरघोस पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. या व्यावसायाला सुरुवात करण्यापूर्वी ESIC व PF या संस्थामध्ये नोंदणी करावी लागते. यासोबतच कामगार न्यायालयात कंपनीची नोंदणी करणेही आवश्यक आहे. हा असा व्यवसाय आहे; जो तुम्ही पैसे आणि जागेची चिंता न करता सुरू करू शकता.

परवाना कसा मिळेल?

खाजगी सुरक्षा एजन्सी सुरू करण्यासाठी खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा 2005 नुसार लायसन्स देण्यात येते. या संस्थेला PSARA  या नावाने ओळखले जाते. खाजगी सुरक्षा एजन्सी सुरू करण्यासाठी परवाना मिळवणे अनिवार्य आहे. तसेच, नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारमार्फत प्रशिक्षण दिले जाते.

परवाना फी? 

सुरक्षा एजन्सी चालवण्यासाठी ठराविक लायसन्स फी भरावी लागते. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तुम्हाला या सुरक्षा एजन्सीचे लायसन्स मिळवण्यासाठी 5,000 रुपये शुल्क भरावे लागते. 5 जिल्ह्यांमध्ये ही सेवा देण्यासाठी 10,000 रुपये भरावे लागतात. इतर राज्यात सुरक्षा एजन्सी चालवण्यासाठी 25,000 रुपये शुल्क भरावे लागते. कायदेशीर प्रक्रिया करून या व्यवसायाचा विस्तार त्यानुसार करता येऊ शकतो.

Source: www.moneycontrol.com