Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Middle Class: 2047 पर्यंत मध्यमवर्गीयांची संख्या 102 कोटी होईल; कुटुंबाचं उत्पन्न 20 लाखांवर जाईल- PRICE Survey

Indian Economy

Image Source : www.hindustantimes.com

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था वार्षिक 6-7 टक्के दराने वाढेल. त्यामुळे 2047 पर्यंत देशातील मध्यमवर्गीयांची संख्या 61 टक्के होईल, असे PRICE संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

India Middle Class: चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर असून नागरिकांचे रहाणीमान आणि दरडोई उत्पन्नही वाढत आहे. People’s Research on India’s Consumer Economy (PRICE) या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, भारतामध्ये 2047 पर्यंत मध्यमवर्गीयांची संख्या 102 कोटी होईल आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 20 लाख रुपये होईल, असे म्हटले आहे.

मध्यमवर्गीयांची संख्या 61% होईल 

“द राइज ऑफ इंडियन मिडल क्लास” असे या अहवालाचे नाव आहे. जागतिक बँकेनुसार भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. (Indian Middle Class income) येत्या काळात वार्षिक 6-7 टक्के दराने भारताची अर्थव्यवस्था वाढेल. त्यामुळे मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, तसेच त्यांचे उत्पन्नही वाढेल, असे अहवालात म्हटले आहे.

2047 पर्यंत भारताची अंदाजित लोकसंख्या 166 कोटी असेल. त्यापैकी 102 कोटी मध्यमवर्गीय असतील. एकूण लोकसंख्येपैकी ही आकडेवारी 61% असेल. सध्याच्या घडीला मध्यमवर्गीय फक्त 43% आहेत. त्यात सुमारे 20 टक्क्यांची वाढ होईल, असे अहवालात म्हटले आहे. भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून जागतिक कंपन्यांकडून मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. येत्या काळात मध्यमवर्गीयांची वाढ म्हणजे कंपन्यांना व्यवसायाच्या संधी आणखी वाढतील.  

प्राइज संस्थेने अहवाल तयार करण्यासाठी सांख्यिकी आकडेवारीचा उपयोग केला. देशभरातील 2 लाख कुटुंबीयांची तीन टप्प्यात माहिती गोळा केली. 2014, 2016 आणि 2021 अशा तीन टप्प्यात जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

मागील दहा वर्षातील विविध उत्पन्न गटांची किती टक्क्यांनी प्रगती झाली हे सुद्धा अहवालात मांडण्यात आले आहे. (Indian middle class income rise) त्यानुसार अती श्रीमंत गटातील कुटुंबांच्या संपत्तीतील वाढ वार्षिक 10 टक्क्यांनी झाली. तर मध्यमवर्गीयांची वाढ 4 ते 7.5 टक्के या दराने झाली. दरम्यान, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्याऐवजी 0.6 टक्क्यांनी कमी झाले. हे चिंताजनक वास्तव समोर आले. कोरोना काळात अल्प उत्पन गटातील कुटुंबांना सर्वाधिक फटका बसला. 

निरक्षरतेचे प्रमाण कमी

उच्च उत्पन्न गट असलेल्या कुटुंबामध्ये दर्जेदार शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Indian Middle Class population) तर अल्प उत्पन्न गटात शिक्षणाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. मात्र, आता हे प्रमाणसुद्धा वाढत आहे. शिक्षण आणि आर्थिक स्थितीचा परस्परसंबंध खूप जवळचा आहे. खासगी क्षेत्राची वाढ होत असताना नोकरी मध्यमवर्गीयांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून पुढे येत आहे.