Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुड न्यूज! अमेरिकन कंपनी मायक्रॉन भारतात 825 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार; तरुणांना 5 हजार जॉबच्या संधी

Semi Conductor Industry

Image Source : www.pulse.ng

मायक्रॉन कंपनीचा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या कंपनीत 5 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील. थेट रोजगारासोबतच अप्रत्यक्ष रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. सेमीकंडक्टर चीप तयार करणारी मायक्रॉन ही आघाडीची कंपनी आहे. फॉक्सकॉन नंतर आता मायक्रॉनचा चीप निर्मिती प्रकल्प गुजरातच्या पदरात पडला आहे.

Micron company investment In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज (शुक्रवार) मोदींनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले. पंतप्रधानांच्या भेटीत सुमारे 6 बिलियन डॉलरच्या करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील बलाढ्य मायक्रॉन कंपनी भारतामध्ये 825 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली.

गुजरात सरकार आणि केंद्राची प्रकल्पाला मदत 

मायक्रॉन कंपनी सेमीकंडक्टर चीप तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. गुजरात राज्यामध्ये कंपनीचा पहिला प्रकल्प उभा राहील. (Micron company investment In India) येथे चीप अॅसेम्बली आणि टेस्टिंग केली जाईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकारही या प्रकल्पाला आर्थिक आणि इतर सुविधांद्वारे मदत करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 2.75 बिलियन डॉलर इतकी असेल. मोदींचा दौरा सुरू होण्याआधी कॅबिनेटने या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. 

5 हजार रोजगार निर्मिती 

मायक्रॉन कंपनीचा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. नव्या प्रकल्पाद्वारे 5 हजार थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील. थेट रोजगारासोबतच अप्रत्यक्ष संधीही मोठ्या प्रमाणात तयार होतील. (Chip factory of Micron) मोठ्या उद्योगामुळे कंपनी ज्या परिसरात आहे तेथील अर्थव्यवस्थाही पालटून जाते. भारत सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रातील तज्ज्ञ तयार करण्यासाठी विविध विद्यापीठांशी सहकार्य करार केला आहे. खास चीप टेक्नॉलॉजी तरुणांना शिकवण्यात येते. सेमीकंडक्टर निर्मिती हे अत्यंत क्लिष्ट काम असते. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार झाल्यास चीनची जागा भारत घेऊ शकते.  

चीनला डावलून चीप निर्मितीसाठी भारताला प्राधान्य 

सेमीकंडक्टर निर्मिती उद्योगाचा समावेश केंद्र सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) योजनेत केला आहे. त्यामुळे कंपनी जेवढे जास्त उत्पादन घेईल तेवढे अनुदान या योजनेद्वारे मिळेल. कोरोनाकाळात जगभरात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला होता. चीप उद्योग सर्वाधिक चीनमध्ये आहे. मात्र, कोरोनानंतर जगभरातील देश चीनमधील कंपन्या बंद करून भारतात आणत आहेत. अमेरिकन टेक गॅझेट कंपनी अॅपल हे त्याचे ताजे उदाहरण. सेमीकंडक्टर उद्योग भारतामध्ये यावेत यासाठी सरकारनेही उद्योगांना सोईसुविधा देऊ केल्या आहेत.

मायक्रॉन कंपनी मेमरी आणि स्टोरेज चीप बनवणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. स्मार्टफोन, पीसीसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला मायक्रॉन कंपनीची चीप बसवलेली असते. येत्या काही दिवसांमध्ये गुजरातमधील प्रकल्पाचे काम सुरू होईल तसेच 2024 पर्यंत फॅक्टरीचं काम पूर्ण होईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प 

तैवानमधील आघाडीची सेमीकंडक्टर निर्मिती कंपनी फॉक्सकॉन आणि वेदांना मिळून गुजरात राज्यात   सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू करत आहेत. या प्रकल्पातूनही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होणार होता. मात्र, नंतर हा प्रकल्प गुजरातच्या पदरात पडला.