Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MG Hector Price Reduction: MG हेक्टरच्या SUV वर करा 1.37 लाखापर्यंत मोठी बचत, पाहा डिटेल्स

MG Hector price reduction

Image Source : www.mgmotor.co.in

MG मोटरने नुकतीच त्यांच्या हेक्टरच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. यामध्ये MG Hector हेक्टर आणि MG Hector 5 Plus च्या किमतींचे दर कमी झालेले पाहायला मिळत आहे. तसेच, या कारच्या व्हेरिएंटनुसार किमतीमध्ये ऑफर दिले आहेत.

MG मोटरने सणासुदीच्या तोंडावर आकर्षक ऑफर जाहीर करुन ग्राहकांना चकीत केले आहे. कारण, MG Hector च्या एका व्हेरिएंटवर 1.29 लाख कपात केली आहे तर MG Hector 5 Plus च्या किमतीवर 1.37 लाखाची कपात केली आहे. हे ऑफर व्हेरिएंटनुसार दिले जाणार आहेत. यामध्ये सात ट्रिम लेव्हलमध्ये स्टाईल, शाईन, स्मार्ट, स्मार्ट ईएक्स, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सॅव्ही प्रो कार उपलब्ध आहेत. हेक्टरची अपडेटेड किंमत 14.73 लाखापासून (एक्स शोरूम) सुरू आहे.

ऑफरचे कारण केले नाही उघड

SAIC मालकीच्या कार निर्मात्याने किंमत कमी करण्याचे अधिकृत कारण उघड केले नाही. मात्र, हे एकतर हेक्टरच्या घटत्या विक्रीमुळे किंवा सणासुदीचा सिझन सुरू झाल्यामुळे ऑफर म्हणून असू शकते. तसेच, मार्केट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, Tata Harrier, Mahindra XUV700 आणि Scorpio N सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तीव्र स्पर्धेमुळे ही किमतीत कपात केली असू शकते.

या व्हेरिएंटवर करता येईल मोठी बचत

MG हेक्टरच्या नवीन किमती 14.73 लाख ते 21.93 लाख रुपये (दोन्ही एक्स शोरूम) दरम्यान आहे. सर्वात कमी कपात मीड साईज SUV बेस स्टाईल व्हेरिएंटमध्ये  27,000 रुपये आहे तर Smart Pro 2.0 turbo diesel MT व्हेरिएंटमध्ये सर्वात जास्त 1.29 लाख रुपयांची कपात दिसून आली आहे. 

तुम्ही Style 1.5 turbo MT घेणार असाल तर शोरुम किमतीनुसार 1472800 रुपयांमध्ये पडणार आहे. यावर तुम्हाला 27,000 रुपयांची बचत करता येणार आहे. तर Smart Pro 2.0 turbo diesel MT तुम्हाला 19,98,800 रुपयांमध्ये घेता येणार आहे. या व्हेरिएंटवर तुम्हाला 1.29 लाख रुपयांची मोठी बचत करता येणार आहे. यात व्हेरिएंटनुसार तुम्हाला प्रत्येक कारवर मोठी बचत करता येणार आहे.

हेक्टर प्लस व्हेरिएंटचा बचतीमध्ये समावेश

फक्त हेक्टरमध्येच नाही तर MG मोटरने हेक्टर Plus च्या सहा आणि सात सिटरच्या किमतीमध्ये ही कपात केली आहे. यामध्ये Sharp 1.5P MT 7S पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीमध्ये 50,000 रुपयांची कपात केली आहे. याची मूळ किंमत एक्स शोरूमनुसार  17.50 लाख रुपये आहे. 

तसेच, Sharp Pro 2.0D MT 7S ची शोरुम किंमत 22.21 लाख आहे. यावर तुम्हाला 1.37 लाखांची बचत करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सात सिटरमध्ये दमदार कार घेणार असाल तर MG  हेक्टरच्या कार घेऊ शकता. कारण, या ब्रॅण्डच्या सर्वच व्हेरियंटवर तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येणार आहे.