Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta Gender Pay Gap: मेटा कंपनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना देतेय कमी पगार,अहवालातून माहिती उघड

Meta Gender Pay Gap

Image Source : www.businessinsider.in

Meta Gender Pay Gap: फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा (Meta) त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार देत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. नक्की या अहवालात काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.

नुकताच महिला दिन (International Women’s Day) पार पडला. या निमित्ताने आपण स्त्री-पुरुष समानतेच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. बऱ्याच वेळा पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार मिळतो का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. याच संदर्भातील एक अहवाल बिझिनेस इनसाइडरने (Business Insider) जाहीर केला आहे. या अहवालानुसार फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा (Facebook parent company Meta) ही त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार देते, अशी माहिती उघड करण्यात आली आहे.

ही माहिती युके (UK) आणि आयर्लंड (Ireland) येथील मेटा कंपनीवर केलेल्या वेतन असमानता या अहवालात नोंदवण्यात आली आहे. बिझिनेस इनसाइडच्या अहवालानुसार मेटा आयर्लंडचा जेंडर पे रिपोर्ट (Gender Pay Report) डिसेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात आला होता. नेमकं या अहवालात काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.

महिलांना किती कमी पगार मिळतो?

मेटाच्या आयर्लंड ऑफिसमध्ये 3000 महिला आणि युके ऑफिसमध्ये 5000 महिला कर्मचारी (Lady Employee) काम करत आहेत. ज्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के आहेत. आयर्लंडमधील मेटाच्या महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या तुलनेत 2022 मध्ये 15.7 टक्के कमी पगार देण्यात आला होता. हाच फरक बोनसमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना 43.3 टक्के कमी बोनस देण्यात आला आहे. युकेच्या पगारातील फरक हा आयर्लंड पेक्षा तुलनेने कमी पाहायला मिळाला आहे.

युकेमध्ये महिलांना कितपत कमी पगार मिळतो?

अहवालानुसार युकेमध्ये महिला कर्मचाऱ्यांना साधारण पुरुषांच्या तुलनेत 2.1 टक्के कमी पगार देण्यात येतोय. याशिवाय महिलांना मिळणारा बोनस देखील पुरुषांच्या तुलनेत 34.8 टक्के कमी आहे. तथापि, 2018 च्या दरम्यान, महिला कर्मचार्‍यांना पुरुषांपेक्षा सरासरी 0.9 टक्के कमी पगार देण्यात आला होता आणि बोनस 40 टक्क्यांपर्यंत कमी होता.

पुरुष कितपत कमाई करतात?

बिझिनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, मेटा कर्मचार्‍यांचा मूळ पगार (Basic Salary) दर वर्षी सुमारे, 1, 50,000 डॉलर किंवा 12,279,523 रुपये प्रति वर्षांपासून सुरू होतो. वार्षिक आधारावर पाहिले तर, आयर्लंडमधील पुरुष कर्मचारी मेटामधून 23,000 डॉलर्सपेक्षा जास्तीची कमाई करत आहेत. यूकेमध्ये महिला कर्मचार्‍यांपेक्षा पुरुष कर्मचारी जवळपास 3,000 डॉलर्सची कमाई करत आहेत.