Mercedes AMG SL 55: मर्सिडीज-बेन्झ इंडियाने गुरूवारी (दि. 22 जून) SL कॅटेगरीमधील सातव्या जनरेशनमधील कार भारतात लॉन्च केली आहे. या कारची किंमत 2.35 कोटी रुपये (एक्स शोरूम) आहे. मर्सिडीज एएमजी एल 55 हे मॉडेल कंपनीसाठी माईलस्टोन आहे. कारण Mercedes AMG SL 55 Roadster ही कार सातव्या जनरेशनमध्ये आहे.
Mercedes AMG SL 55 ही कार 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी ही कार भारतात लॉन्च होत आहे. मर्सिडीज बेन्झ एस एल 55 या कारला दोनच दरवाजे असून, यात 4 जण बसू शकतात. बेसिकली ही एक स्पोर्ट्स कार आहे.
मर्सिडीज एएमजी एसएल 55 ही कार एका वेगळ्या डिझाईनमध्ये आणण्यात आली आहे. त्यामुळे हिचे डिझाईन हा नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हिचे वजन पूर्वीच्या मॉडेलपेक्षा 20 किलोने कमी केले आहे. तसेच ही कार 8 प्रकारच्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त कारमधील अंतर्गत सजावट आणि टेक्नॉलॉजीचा आविष्कार हा अदभूत आहे. बसण्याच्या मऊ सीट, एएमजी मल्टीफंक्शनल स्टिअरिंग, त्यावर हाताने शिवलेले लेदर आणि समोर किमान 12 इंचाचा डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही कार अवघ्या 3.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते. हिचा टॉप स्पीड हा 315 प्रति तास इतका आहे. त्यामुळे ही सर्वांत वेगवान कार मानली जाते.
मर्सिडीज-बेन्जच्या भारतातील स्वस्त आणि महाग कार
सध्या मर्सिडीज-बेन्ज कंपनीच्या भारतात 26 मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये Sedans, SUV's, Hatchback, Convertibles आणि Coupes या प्रकारामध्ये मोडणाऱ्या कार्स आहेत. तर अजून 10 कार्स भारतात लॉन्च होण्याच्या मार्गावर आहेत.
भारतात मर्सिडिज-बेन्ज सर्वांत स्वस्त कार 42 लाखापासून सुरू होते. तिचे मॉडेल आहे, A-Class Limousine आणि सर्वांत महागडी कार 3.30 कोटींची आहे. तिचे मॉडेल आहे, AMG GT 4 Door Coupe.
या आहेत जगातील सर्वांत महागड्या मर्सिडिज कार
मर्सिडिज-बेन्ज कंपनीच्या कार हा लक्झरी कार या कॅटेगरीत मोडल्या जातात. आपण मर्सिडीज कंपनीच्या जगभरातील टॉप 5 महागड्या कार कोणत्या, त्या पाहुयात.
Mercedes AMG One ( किंमत: 2.8 मिलिअन डॉलर)
Mercedes-Benz CLK-GTR Roadster (किंमत: 1.5 मिलिअन डॉलर)
Mercedes-Benz SLR Sterling Moss (किंमत: 1 मिलिअन डॉलर)
Mercedes-Maybach G650 Landaulet (किंमत: 550,000 डॉलर)
Mercedes-Benz SLR Mclaren 722 S (किंमत: 500,000 डॉलर)