उन्हाळा सुरू असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यातच बाहेर फिरायला गेल्यावर घाम येणे, धुळीचे इन्फेक्शन होणे किंवा टॅनिंग सारख्या समस्यांना पुरुषांना देखील सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात सर्व पुरुषांना भेडसावणारी समस्या म्हणजे चेहऱ्यावर ऑईल येणे. या त्रासामुळे पुरळ येणे, पिगमेंटेशन, चेहरा काळा पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावरील ऑईल कमी करण्यासाठी फेसवॉश वापरला जातो. आज आम्ही तुम्हाला 200 रुपयांच्या आतील चार बेस्ट फेसवॉशबद्दल माहिती देणार आहोत. ऑनलाईन रिटेल वेबसाईट अमेझॉनवरून या फेसवॉशची खरेदी केल्यावर 30% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
Table of contents [Show]
200 रुपयाच्या आतील 4 बेस्ट फेसवॉश
Wow Skin Science Face Wash

Wow कंपनीचा फेस ब्रायटनिंग आणि ऑईल कंट्रोल करणारा फेसवॉश अमेझॉनवर 196 रुपयांना उपलब्ध आहे. या फेसवॉशची मूळ किंमत 249 रुपये असून यावर ग्राहकांना 21% डिस्काउंट दिला जाणार आहे. या फेसवॉशमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ कमी होण्यासाठी याची मदत होईल. तसेच चेहरा अधिक उजळ व्हायला हा फेसवॉश मदत करेल.
Nivea Men's Face Wash

Nivea कंपनीचा डार्क स्पॉट कमी करणारा हा फेसवॉश अमेझॉनवर केवळ 160 रुपयांना उपलब्ध आहे. या फेसवॉशची मूळ किंमत 225 रुपये असून यावर ग्राहकांना 29% डिस्काउंट दिला जात आहे. चेहऱ्यावरील ऑईल कमी करण्यासाठी आणि चेहरा साफ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
The Man Company D Tan Face Wash

The Man Company D Tan फेसवॉश अमेझॉनवर ग्राहकांना 186 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फेसवॉशची मूळ किंमत 249 रुपये असून यावर ग्राहकांना 25% डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये आयुर्वेदिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील ऑईल कमी होण्यासाठी मदत होते आणि चेहरा अधिक उजळ होतो.
Pond's men Face Wash

Pond's कंपनीने खास पुरुषांसाठी देखील फेसवॉश बनवला आहे. या फेसवॉशच्या वापरामुळे चेहऱ्यावरील ऑईल कंट्रोलमध्ये राहत असून चेहरा अधिक उजळ व्हायला मदत होते. अमेझॉनवर हा फेसवॉश 175 रुपयांना उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 235 रुपये आहे. अमेझॉनवर ग्राहकांना 26% डिस्काउंटसह तो उपलब्ध करून देण्यात येत आहे.