• 31 Mar, 2023 08:24

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mediclaim: मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही!

Mediclaim is not Health Insurance

Mediclaim: मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत (Medical Emergency) आपण सर्वोत्तम फायदे मिळवू शकता असे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे मेडिक्लेम (Mediclaim) आणि आरोग्य विमा योजना (Health Insurance Policy). या दोन्ही योजनांबाबत आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेऊ.

“सर, तुमचा मेडिक्लेम आहे काय?”

“होय, आहे ना!”

“उत्तम आणि तुम्ही हेल्थ इन्शुरन्स देखील घेतलाय काय?”

“अहो, सांगितलं ना! माझा मेडिक्लेम आहे म्हणून. मला अजून कोणत्याही नवीन इन्शुरन्सची आवश्यकता नाहीये.”

“माफ करा. पण मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही.”

मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत (Medical Emergency) आपण सर्वोत्तम फायदे मिळवू शकता असे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे मेडिक्लेम (Mediclaim) आणि आरोग्य विमा योजना (Health Insurance Policy). आपल्याकडे आर्थिक संकल्पनांची (Financial Terms) इतकी सरमिसळ झालेली आहे की, आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला, मेडिक्लेम आणि मेडिक्लेम सुविधेला, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन समजत आलो आहोत. वास्तविक पाहता या दोन्ही संकल्पना हॉस्पिटलायझेशन आणि वैद्यकीय खर्चाशी (Medical Expenses) संबंधित असल्या, तरी देखील त्यांचे फीचर्स, बेनिफिट्स, यांचा विचार करता त्या परस्परांहून पूर्णतः भिन्न अशा संरक्षण योजना आहेत.

मेडिक्लेम म्हणजे काय? | What is Mediclaim?

सर्वात प्रथम म्हणजे मेडिक्लेम ही एक प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा) आहे; जी आपल्याला वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी विशिष्ट आर्थिक संरक्षण देते. पॉलिसीच्या कालावधीत अपघात झाल्याने किंवा आजारपण किंवा शस्त्रक्रिया झाल्याने हॉस्पिटलायझेशन-संबंधी आणि काही प्रकरणांमध्ये घरी असताना केल्या जाणाऱ्या वैद्यकीय खर्चाची (Home Care) काळजी घेते.

मेडिक्लेमचे प्रकार | Types of Mediclaim

मेडिक्लेमचे दोन प्रकार आहेत; एक कॅशलेस आणि दुसरा रिइम्बर्समेंट (Cashless & Reimbursement). म्हणजे पॉलिसीच्या कक्षेत येणाऱ्या निवडक हॉस्पिटल्समध्ये आपण  कॅशलेस मेडिक्लेमचा लाभ घेऊ शकतो किंवा आपण वैद्यकीय बिले (Medical Bills) कंपनीकडे जमा केल्यावर झालेल्या खर्चाची कंपनीकडून प्रतिपूर्ती / रिइम्बर्समेंट मिळते.

आरोग्य विमा म्हणजे काय? | What is Health Insurance?

आरोग्य विमा हे एक विमा कवच (Insurance Cover) आहे, जे आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया खर्चासाठी संपूर्ण कव्हरेज देते. आपल्याकडे आरोग्य विमा असल्यास, आपल्याला मेडिकल इमर्जन्सीमध्ये आलेल्या खर्चाची आपल्या इन्शुरन्स कंपनीद्वारे परतफेड केली जाते किंवा इन्शुरन्स कंपनी थेट हॉस्पिटलमध्ये आपले मेडिकल बिल सेटल करते. मेडिक्लेमच्या तुलनेत, आरोग्य विम्यामध्ये हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाव्यतिरिक्त इतर संबंधित खर्चांचा समावेश होतो. यामध्ये ॲम्ब्युलन्स चार्जेस, हॉस्पिटलायझेशन-पूर्व आणि पोस्ट-केअर, डॉक्टरांची फी, निदान चाचण्या (Diagnostic Tests) इत्यादींचा समावेश असू शकतो. आरोग्य विमा योजना पॉलिसीधारकाला निश्चित लाभ देतात, काही वेळा तर प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यापूर्वीच थेट लाभ दिला जातो.

आरोग्य विमा आणि मेडिक्लेममध्ये फरक काय?

मेडिक्लेम केवळ हॉस्पिटलायझेशनच्या खर्चावर कव्हरेज देते; म्हणजे तुम्ही केवळ रुग्णालयात दाखल असाल तर आणि काही प्रकरणांमध्ये घरी असताना देखील केला जाणारा वैद्यकीय खर्च कव्हर करते. या पॉलिसींना गंभीर आजारांसंबंधी संरक्षण प्रदान करताना काही मर्यादा असू शकतात. याउलट हेल्थ इन्शुरन्स एक सर्वसमावेशक कव्हर ऑफर करतो. यापैकी काही खर्चांमध्ये वार्षिक आरोग्य तपासणी, दैनंदिन रुग्णालयातील रोख रक्कम, ओपीडी खर्च, हृदयविकार आणि कर्करोगासह विशिष्ट रोग किंवा परिस्थितींपासून संरक्षण आणि पर्यायी उपचार AYUSH यांचा देखील समावेश आहे. ज्यांना New-Age Policy म्हटले जाते, त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज् तर आपल्याला पहिल्या निदानावर (First Diagnosis) इन्शुरन्स क्लेमची रक्कम देतात. एवढेच काय, पण आपल्याला नेटवर्क हॉस्पिटल किंवा रिइम्बर्समेंट-क्लेमसाठी पाठपुरावा करावयाची आवश्यकता देखील नसते.. ज्यमुळे आपण आपल्याला सोयीस्कर अशा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊन शकतो.

मेडिक्लेममध्ये कोणतेही ॲड-ऑन कव्हर नाहीत. पण आरोग्य विम्यांतर्गत (हेल्थ इन्शुरन्स) फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, सिनिअर सिटीझन हेल्थ प्लॅन, किंवा क्रिटिकल इलनेस कव्हर, आउट पेशंट बेनिफिट, रिस्टोरेशन बेनिफिट, मॅटर्निटी बेनिफिट आणि वंध्यत्व कव्हर इत्यादी सारखे ॲड-ऑन रायडर्स समाविष्ट आहेत.

काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये, व्यक्तीला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये आणि तेथून पुन्हा ॲडव्हान्स टेस्ट्ससाठी  दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये किंवा चाचणी केंद्रात न्यावे लागेल. मेडिक्लेममध्ये हे ॲम्ब्युलन्स-चार्जेस समाविष्ट नसतात. तथापि, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मात्र हे चार्जेस एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर करतात.

हेल्थ इन्शुरन्समध्ये मातांना बाळाला जन्म देण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर लागणाऱ्या खर्चासाठी अंतर्निहित तरतूद असते - मग ते सिझेरियन डिलिव्हरी असो, किंवा नवजात बाळासाठी कोणतेही वैद्यकीय उपचार असो. मेडिक्लेममध्ये मात्र केवळ हॉस्पिटलायझेशनचा खर्च समाविष्ट असतो आणि इतर अतिरिक्त खर्चांचा त्यात समावेश नाही.

मेडिक्लेम की हेल्थ इन्शुरन्स, काय निवडावे? 

मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स यापैकी एक निवडायचे असल्यास काही घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आपली आर्थिक स्थिती, प्रिमिअम भरण्याची क्षमता, आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे वय, वैद्यकीय स्थिती, असलेल्या आरोग्याच्या समस्यांचे स्वरूप, आवश्यक असे ॲड-ऑन कव्हर बेनिफिट्स (रायडर्स),  इत्यादी बाबींचा विचार करून आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी मेडिकल कव्हरची निवड करू शकतो.

अर्थातच, मेडिक्लेमच्या तुलनेत हेल्थ इन्शुरन्सची व्याप्ती खूप विस्तृत आहे. पण त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स हा मेडिक्लेमपेक्षा अधिक महाग देखील असतो. मात्र आरोग्य विम्याच्या बाबतीत, आपल्याला आपल्या खिशातून खर्च करण्याची चिंता करण्याची गरज नाही. मेडिक्लेमसाठी हाच नियम लागू होत नाही. मेडिक्लेम हे देखील एक कॉम्पॅक्ट पॅकेज आहे, ज्यामध्ये आपण ज्या प्रकारचा प्लॅन निवडू, त्या प्रमाणात बेनिफिट्स देखील एन्जॉय करू शकतो. तुम्ही देखील नुकतीच कमाई सुरू केली असेल आणि जास्त खर्च करू शकत नसाल, तर मेडिक्लेमची निवड केलेली उत्तम. पण जर तुम्हाला प्रीमियम परवडत असेल, तर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे, केव्हाही संयुक्तिक ठरते.