मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया टेक कंपनीकडून हाय स्पीड Helio G36 चीप लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा गेमिंगचा आनंद दुप्पट होणार आहे. कोणत्याही अडथळ्याविना तुम्हाला मोबाईलवर गेम खेळता येणार आहे. खास गेमिंगसाठी बनवण्यात येणाऱ्या बजेट मोबाईल्समध्ये ही चिप बसवण्यात येणार आहे.
सोमवारी कंपनीने या अत्याधुनिक चीपसेटचे उद्घाटन केले. Helio G36 हा अत्यंत पावरफुल प्रोसेसर (Gaming mobile) असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Helio G36 हा प्रोसेसर TSMC (Taiwan Semiconductor Manufacturing Company) चीप प्रोडक्शन प्रोसेस वापरुन तयार करण्यात आला आहे. मोबाईलचा कॅमेरा, लेन्स, वायफाय, ग्राफिक्स, डिस्प्ले, नेटवर्क कनेक्टिव्हिटी यांचा परफॉर्मन्स वाढणार आहे. रिफ्रेश रेट देखील या प्रोसेसरमुळे वाढणार आहे.
भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या परवडणाऱ्या फोन सेगमेंटमध्ये Helio G36 chip चा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. खास 4G मोबाईल फोनसाठी हा प्रोसेसर तयार करण्यात आला आहे. रेडमी, रिअल मी, टेक्नो, व्हिवो या कंपन्यांशी मीडियाटेक कंपनी सहकार्य करार करण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या मॉडेल्समध्ये हा अत्याधुनिक प्रोसेसर (High speed mobile processor) दिसू शकतो. जर तुम्ही बजेट फोन घेत असाल तरीही यातून तुम्हाला गेमिंगचा चांगला अनुभव मिळेल.
मोबाईलचा स्पीड हा प्रोसेसरवरुन ठरत असतो. बऱ्याच वेळेला बजेट स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात आलेला प्रोसेसर काही दिवसांतच स्लो होतो. त्यामुळे गेमिंग तर सोडा साधा फोनही नीट काम करत नाही. त्यामुळे आता गेमिंगसोबत मोबाईलच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा प्रोसेसर योग्य ठरू शकतो.