जहाज बांधणी उद्योगातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर कंपनीच्या शेअरने वर्ष 2022 मध्ये गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिले. वर्ष 2022 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डरचा शेअर 250% वधारला. या शेअरने 936.85 रुपयांचा 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला.
माझगाव डॉक शिपबिल्डर ही सरकारी कंपनी आहे. भारतीय नौदलासाठी कंपनीकडून युद्धनौका, पाणबुड्यांची निर्मिती केली जाते. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन दिले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर कंपनीला याचा फायदा झाला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डरच्या शेअरने मागील 10 महिन्यात 250% झेप घेतली आहे. या शेअरमध्ये एक दोन अपवाद सोडले तर वर्षभर तेजी दिसून आली.
वर्षभरात माझगाव डॉक शिपबिल्डरच्या शेअरने 224 रुपयांचा 52 आठवड्यांतील नीचांकी स्तर गाठला आणि 936.85 रुपयांचा उच्चाकी स्तर देखील अनुभवला. 24 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई शेअर बाजारात माझगाव डॉक शिपबिल्डरचा शेअर 224 रुपयांवर टहोता. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 793.70 रुपयांपर्यंत वाढला. त्यात 252% वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात ज्या गुंतवणूकदारांनी एक लाखांची गुंतवणूक केली असती तर त्यांचे गुंतवणूक मूल्य 3.54 लाख इतके वाढले असते.
माझागाव डॉक शिपबिल्डरच्या शेअरमध्ये मागील पाच सत्रात 8% तेजी दिसून आली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 16008 कोटी इतके आहे. एक वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 185% रिटर्न दिला.