Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Bull: रामदेव अग्रवाल ‘वॉरेन बफे फ्रॉम इंडिया’

Raamdev Agrawal Warren Buffett from India

Raamdev Agrawal: रामदेव अग्रवाल हे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक देखील आहेत. मार्केटमधील सुपरहिट इन्व्हेस्टर म्हणून परिचित असलेले अग्रवाल हे आहेत आपले आजचे मार्केट बुल (Market Bull).

जर तुम्ही शेअर मार्केटमधील मुरलेले खेळाडू असाल तर रामदेव अग्रवाल (Raamdeo Agrawal) यांचे नाव न्यूज चॅनेलवर किंवा वर्तमानपत्रात तुम्ही नक्कीच वाचले असेल. रामदेव अग्रवाल हे गुंतवणुकीच्या जगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. मार्केटमध्ये त्यांचा प्रभाव असा होता की, त्यांना ‘वॉरेन बफे फ्रॉम इंडिया’ (Warren Buffett from India) म्हणूनही ओळखले जाते. रामदेव अग्रवाल हे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक (Raamdeo Agrawal, Chairman of Motilal Oswal Group & Co-Founded of Motilal Oswal Group) म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे आज कंपनीमध्ये सुमारे 36% हिस्सा आहे. 2018 पर्यंत रामदेव अग्रवाल यांची फोर्ब्सच्या माहितीनुसार, 1 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती होती. ते मार्केटमध्ये नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूडमधील सिनेअभिनेता सैफ अली खान याने देखील रामदेव अग्रवाल यांची मुलाखत घेतली आहे. मार्केटमधील सुपरहिट इन्व्हेस्टर रामदेव अग्रवाल (Superhit Investor Raamdev Agrawal) हे आहेत आपले आजचे मार्केट बुल (Market Bull).

रामदेव अग्रवाल यांचे सुरुवातीचे आयुष्य (Early life of Raamdev Agarwal)

रामदेव अहवाल यांचा जन्म छत्तीसगढमधील रायपूर येथील एका शेतकरी परिवारात झाला. रामदेव यांनी मुंबईतून उच्च शिक्षण पूर्ण करून ते चार्टेड अकाऊंटंट (Charted Accountant-CA) झाले. मुंबईत ते आणि मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) हे एकाच हॉस्टेलमध्ये राहत होते. ओसवाल यांच्या मते अग्रवाल हे एक पुस्तकी किडा होते. ज्यांना कंपन्यांचे रिपोर्ट्स आणि बॅलन्स शीट्स वाचण्यात कायम रस होता.

रामदेव अग्रवाल यांची मार्केटमध्ये एंट्री (Raamdev Agarwal's entry in Market)

रामदेव अग्रवाल आणि मोतीलाल ओसवाल (Motilal Agrawal & Motilal Oswal) या दोघांचा शेअर मार्केट म्हणजे अगदी खास विषय होता. शेअर मार्केटमधील आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी 1987 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) मध्ये सबब्रोकर (Sub-Broker) होण्याचे ठरवले. त्यानंतर 1990 पर्यंत ते स्टॉक ब्रोकर (Stock Broker) बनले व त्यांनी स्वतः स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास (Invest) सुरुवात केली. शेअर मार्केटमध्ये सुरूवातीच्या काळातच त्यांनी आपला 10 लाख रुपयांचा पोर्टफोलिओ बनवण्यात यश मिळवले. त्यानंतर जेव्हा 1992 मध्ये हर्षद मेहता यांच्या घोटाळ्याला सुरुवात झाली, तेव्हा तर चमत्कारच झाला. या काळात अग्रवाल यांनी आपल्या 10 लाखांची गुंतवणूक 30 कोटींवर नेली. पण जेव्हा मेहतांचा घोटाळा जगासमोर आला. तेव्हा पुन्हा त्यांचे 30 कोटी 10 कोटींवर येऊन थांबले.


1994 मध्ये रामदेव अग्रवाल बर्कशायर हॅथवेच्या शेअर होल्डर्सच्या मिटिंगसाठी अमेरिकेला गेले होते. तिथे ते मार्केट गुरू वॉरेन बफे (Warren Buffett, chairman and CEO of Berkshire Hathaway) यांना भेटले. वॉरन बफे यांना भेटल्यानंतर त्यांचा मार्केटमधील दृष्टिकोन पूर्णत: बदलला. त्यांनी त्यानुसार आपल्या स्ट्रॅटेजीमध्येही बदल केले. त्यांच्या 10 कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यावेळी 225 शेअर्सचा समावेश होता. त्यातील त्यांनी बरेचसे शेअर्स विकून फक्त 15 कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले. त्यांचा हा निर्णय बरोबर ठरला आणि वर्ष 2000 पर्यंत त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य (Portfolio Valued) 100 कोटी रुपये झाले. त्यांची ही कामगिरी अशीच पुढे चालू राहिली आणि 2018 मध्ये 'फोर्ब्स'ने त्यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश केला. 

रामदेव अग्रवाल यांचा मार्केट मंत्रा! (Market Mantra of Raamdev Agrawal)

रामदेव अग्रवाल कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी चार गोष्टींची खात्री नेहमी करून घेत असत. या चार गोष्टी म्हणजे क्वालिटी, ग्रोथ, लोंगेव्हिटी आणि प्राईस.

दर्जा (Quality)

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी (इंडिया) लिमिटेडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर रामदेव अग्रवाल यांना क्वालिटीचे महत्त्व कळू लागले. फायनान्शिअल टेक्नॉलॉजी (इंडिया) लिमिटेड यामधील गुंतवणूक हा त्यांच्यासाठी एक धडा होता. यामध्ये त्यांना भरपूर नुकसान सहन करावे लागले होते. 

वाढ (Growth)

अग्रवाल नेहमी कोणत्याही ग्रोथ स्टॉकला एक सामान्य स्टॉकप्रमाणे नाही तर एका मोठ्या व अद्याप लोकांच्या नजरेत नसणारी कंपनी मानत असत. या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी पैशात होते व त्यावर भरपूर रिटर्न्स मिळवणे शक्य असते. अग्रवाल म्हणतात की, इन्व्हेस्टमेंट म्हणजे भविष्यातील मूल्याचा  वर्तमान काळात अंदाज लावणे आणि त्यानुसार निर्णय घेणे.

दीर्घकालीन गुंतवणूक (longevity)

हा घटक इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्वेस्टर्समध्ये प्रोत्साहन निर्माण करतो. यामुळे गुंतवणूकदाराला स्थिरता मिळते. भरपूर माहिती मिळते. ज्याचा अभ्यास करून निर्णय घेणे सोपे ठरू शकते.

किंमत (Price)

अग्रवाल यांच्या मते, कोणताही स्टॉक घेताना त्याची किंमत त्याच्या खऱ्या मूल्यपेक्षा कमी असली पाहिजे. ज्यामुळे भविष्यात मूल्य योग्य ठरल्यानंतर आपल्याला फायदा मिळवणे शक्य होते.