केंद्र सरकारची CGHS ही योजना मुख्यता नागरिकांना चांगली आणि स्वस्त आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. हीचे स्वरूप मोठे असून गेल्या सहा दशकांपासून ही योजना उपचार सेवा प्रदान करत आहे. याआधी ही सुविधा फक्त महिला कर्मचाऱ्यांना लागू होती. आता केंद्राने पुरूष कर्मचाऱ्यानांसुद्धा या सुविधेत सामावून घेतले आहे. त्यामुळे पुरूष कर्मचाऱ्यांना थोड आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
काय झाला बदल?
सध्या केंद्र सरकार इतरही आरोग्य योजना प्रदान करत आहेत. मात्र, CGHS आरोग्य योजना फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. या योजनेद्वारा पुरूष कर्मचारी त्यांच्या आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाही या योजनेत सहभागी करुन घेवू शकणार आहेत. फक्त यासाठी आई-वडील किंवा सासू-सासरे त्यांच्या घरी राहतात किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावरच निर्भर आहेत, त्यांच्यासाठी हे लाभदायी ठरणार आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांवरचा बराच आर्थिक ताण कमी होणार आहे.
कोणाला मिळतो लाभ?
CGHS या योजनेचा लाभ सर्व केंद्र सरकारचे कर्मचारी, संसदेचे सदस्य, माजी राज्यपाल आणि नायब राज्यपाल, स्वातंत्र्य सैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे सध्याचे आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, केंद्रीय पेन्शनधारक आणि त्यांचा परिवार, रेल्वे बोर्डाचे कर्मचारी, दिल्ली पोलिस आणि पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
काय आहेत सुविधा?
CGHS या योजनेद्वारा कर्मचाऱ्यांना अनेक सुविधांचा लाभ मिळतो. यामध्ये ओपीडीपासून आॅपरेशन, चेकअप, मोफत औषध आणि विशेष सेवा देण्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक गोष्टींना सहजरित्या तोंड देता येते. याचबरोबर यामध्ये आयुर्वेद व योगाचाही समावेश आहे. तसेच, या सेवा CGHS क्लिनिक, सरकारी हाॅस्पिटल आणि CGHS च्या यादीतील हाॅस्पिटलमध्ये प्रदान करण्यात येतात. एखाद्या वेळेस इमर्जन्सी असली तरी दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये नेल्यास तोसुद्धा खर्च या योजनेद्वारा देण्यात येतो.