Personal Loan : जर तुम्हाला संकटकाळात पैशांची गरज भासली तर तुम्ही वैयक्तिक कर्जाद्वारे पैशांची गरज त्वरित भागवू शकता. गृह कर्ज किंवा इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाची रक्कम कितीही कारणांसाठी वापरली जाऊ शकते. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी मोजक्या कागदपत्रांची आवश्यक्ता असते.
Table of contents [Show]
वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जास्त असतो
बँका वैयक्तिक कर्जावर विशेष शुल्क आकारतात. कारण हे कर्ज असुरक्षित मानले जाते. यामागील कारण म्हणजे कर्जदार कर्जासाठी सुरक्षा म्हणून कोणतीही मालमत्ता ठेवण्यास बांधील राहत नाही. वैयक्तिक कर्जावरील शुल्क आणि व्याजदर हा इतर कर्जांच्या तुलनेत जास्तच असतो, आणि हा व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो. तसेच वैयक्तिक कर्ज घेतांना ग्राहकाला विविध प्रकारचे बँक कर्ज शुल्क (Bank loan charges) भरावे लागते.
कर्ज प्रक्रिया शुल्क (Loan Processing Fee)
प्रत्येक बँकेत कर्ज घेते वेळी कर्ज शुल्क भरावे लागते. प्रत्येक बँक कर्ज प्रक्रिया शुल्काची किमान आणि कमाल टक्केवारी सेट करते. कर्जाची प्रक्रिया आणि मंजूरी करीता बँकेला काही ओव्हरहेड खर्च करावा लागतो. त्यासाठी बँक ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्क आकारते. वैयक्तिक कर्जामध्ये प्रक्रिया शुल्क एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.5 ते 2.50 टक्क्यापर्यंत असते. तर काही बँका अंतिम कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के शुल्क आकारते. त्यामुळे पर्सनल लोन घेतांना बँका आकारत असलेले कर्ज प्रक्रिया शुल्क आपल्याला परवडणारे आहे का? हे तपासून बघा.
पडताळणी शुल्क (Verification Fees)
कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता आहे का? याचे क्रॉस व्हेरिफिकेशन बँक करीत असते. बँका कर्जदाराच्या क्रेडिट योग्यतेची पडताळणी आणि कर्ज परतफेडीचा इतिहास तपासतात. या प्रक्रिया पूर्ण करण्यास जो काही खर्च लागतो. तो खर्च बँका कर्जदाराकडून पडताळणी शुल्क म्हणून आकारते.
जीएसटी कर (GST Tax)
ग्राहकाला कर्ज मंजूरी किंवा परतफेडीच्या कालावधीत कोणत्याही अतिरिक्त सेवेची गरज भासल्यास त्याला ती सेवा मिळवून घेण्यासाठी जीएसटी स्वरुपात नाममात्र शुल्क भरावे लागेल.
फोरक्लोजर शुल्क (Foreclosure Fees)
ग्राहक कर्जावर भरत असलेल्या व्याजामधून बंकांना पैसे मिळते. मात्र जर का ग्राहकाने कर्जाच्या देय तारखेपूर्वीच प्रीपेमेंट केले तर बँकेचे नुकसान होते. मग हा तोटा भरुन काढण्यासाठी बँक प्रीपेमेंट दंड आकारते. फोरक्लोजर शुल्क किंवा फोरक्लोजर दंड म्हणून बँका साधारण 2 ते 4 टक्के शुल्क आकारते.
ईएमआय (EMI)बाउन्स झाल्यास होणारा दंड
ग्राहकांनी ईएमआय भरतांना EMI ची तारीख येण्यापूर्वी बँकेच्या खात्यात पूरेसा निधी ठेवणे आवश्यक असते. EMI भरण्यास उशीर झाला तर, बँका त्यावर दंड आकारते. त्याला ईएमआय (EMI)बाउन्सवर दंड असे म्हणटले जाते.