Make digital payments now, without internet: फोन पे, गुगल पे किंवा आदि अॅप्सने डिजिटल पेमेंट करण्यासाठी इंटरनेट असणे आवश्य आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. मात्र तुमच्याकडे ही चुकीची माहिती आहे. कारण मोबाईलमध्ये इंटरनेट नसताना ही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता, यासाठी खाली दिलेली माहिती अचूक वाचा.
*99# डायल करा
विशेष म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्मार्टफोन नाहीत, अशा व्यक्तीदेखील ऑनलाईन पेमेंट करु शकतात. तसेच UPI, ऑनलाईन मोड, इंटरनेट नसणाऱ्या मोबाईलसाठीदेखील ही सेवा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करण्यासाठी युजर्सला सर्वप्रथम *99# डायल करावे लागणार आहे. ही सेवा USSD नावाची ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नोव्हेंबर 2012 मध्ये ही सेवा सुरू केली होती. USSD आणि UPI आल्याने युजर्स आता इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करणे शक्य आहे.
डिजिटल पेमेंटची प्रोसेस
इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करण्यासाठी, सर्वप्रथम सरकारचे BHIM अॅप डाऊनलोड करावे. यानंतर सर्व माहिती रजिस्टर करा. UPI अकाउंट रजिस्टर करताना तुमच्या बँक खात्याशी जोडलेला फोन नंबर टाइप करा. यानंतर मोबाईलवरून*99# डायल केल्यानंतर, तुमच्या फोनच्या स्क्रीनवर 7-पर्याय मेनू दिसतील. यामध्ये सेंड मनी, रिसीव्ह मनी, चेक बॅलन्स, माय प्रोफाइल, पेंडिंग रिक्वेस्ट, ट्रान्झॅक्शन आणि यूपीआय पिनचा पर्याय उपलब्ध असणार आहे. जर तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तर ऑप्शन 1 ने रिप्लाय करा. रिप्लाय केल्यानंतर तुम्ही UPI आयडी, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आणि फोन नंबरच्या मदतीने हे ट्राजेक्शन यशस्वी करू शकता. तुम्ही UPI पर्याय निवडला, तर तुम्हाला ज्या युजर्सला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI आयडी टाका. तुम्ही बँक खाते निवडल्यास, तुम्हाला लाभार्थीचा बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड टाइप करा. जर तुम्ही मोबाईल नंबर पर्याय निवडल्यास, तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर सिलेक्ट करा. यानंतर, तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत ती रक्कम टाका. सगळयात शेवटी तुम्हाला तुमचा UPI पिन टाकून सेंड ऑप्शन क्लिक करावा लागेल. व्यवहार झाला की, व्यवहार पूर्ण झाल्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. मात्र या सेवेसाठी तुम्हाला फक्त 50 पैसे इतके सर्व्हिस चार्ज लागणार आहे.