1 फेब्रुवारी 2023 ला अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman) यांनी खास महिलांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी महिला सन्मान बचत पत्र योजनेची (MSSC) घोषणा केली. या योजनेत गुंतवणूक करून महिला सर्वाधिक परतावा मिळवू शकतात. या योजनेची सुरुवात पोस्ट ऑफिसपासून करण्यात आली होती. त्यानंतर कॅनरा बँक (Canara Bank) आणि बँक ऑफ इंडियामध्ये (BOI) महिलांना हे खाते ओपन करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Badoda) महिला ग्राहकांना देखील बँकेत महिला सन्मान बचत पत्र खाते ओपन करता येणार आहे, अशी घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. या निमित्ताने महिला सन्मान बचत पत्र योजनेबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक कोण आणि किती करू शकते?
महिला सन्मान बचत पत्र (MSSC) योजने अंतर्गत वैयक्तिक महिला MSSC खाते सुरू करू शकते. तर अल्पवयीन मुलीचे खाते पालकांच्या नावे उघडता येणार आहे. या खात्यात कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करता येईल.
MSSC खात्यावर व्याजदर किती मिळतो?
महिला सन्मान बचत पत्र (MSSC) खात्यावर 7.5% वार्षिक व्याजदर मिळतो. प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याज गुंतवणुकदाराच्या खात्यात जमा केले जाते. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा करपात्र आहे.
MSSC खाते किती कालावधीसाठी सुरू करता येते?
खाते सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी परिपक्व होते. 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेंतर्गत खाते सुरू करता येईल.
वेळेआधी खाते बंद केले तर?
खातेधारकाचा मृत्यू, गंभीर आजाराने झाल्यास खाते वेळेआधी बंद करता येईल. खाते सुरू केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत बंद करत असाल तर व्याजदरापैकी 2% दंड भरावा लागेल. त्यामुळे 5.5% व्याजदराने पैसे मिळतील.
खात्यातून अर्धी रक्कम काढता येते का?
महिला सन्मान बचत पत्र (MSSC) खाते सुरू केल्यानंतर 1 वर्षानंतर गुंतवणुकदार 40% पर्यंत रक्कम काढू शकतो.
Source: hindi.moneycontrol.com