Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Charging Station : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनमध्ये वेगाने वाढ; महाराष्ट्र आघाडीवर

EV Charging Station : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनमध्ये वेगाने वाढ; महाराष्ट्र आघाडीवर

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची उपलब्धा जेवढी जास्त तेवढ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे. सध्या देशात जुलैपर्यंत एकूण 8735 EV चार्जिंग स्टेशन उपलब्ध (EV Charging Station) आहेत. त्यापैकी सर्वाधिक चार्जिंग पॉईंटसह महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहे. त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करत आहेत. मात्र, या वाहनांच्या खरेदीसाठी नागरिकांना सर्वात मोठा अडथळा समजला जात होता तो म्हणजे, या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची (EV Charging Station) उपलब्धता. त्यामुळे शहरी भाग सोडले असता इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, सद्यस्थितीत भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन निर्मितीमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. तसेच देशात चार्जिंग स्टेशनच्या संख्येच्याबाबतीत महाराष्ट्र हा अव्वल ठरला आहे.

देशात सर्वाधिक चार्जिंग स्टेशन महाराष्ट्रात-

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची उपलब्धा जेवढी जास्त तेवढ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे. सध्या देशात जुलैपर्यंत एकूण 8735 EV चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वाधिक चार्जिंग पॉईंटसह महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहे. त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आज घडीला एकूण 2492 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत. तर त्यामध्ये 3,793 ईव्ही चार्जर आणि 4211 चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली मध्ये 1627 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक मध्ये सर्वाधिक 753 चार्जिंग स्टेशन आहेत.

प्रमुख शहरांना 18000 चार्जिंग स्टेशनची गरज

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. उर्जा मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशातील जास्त लोकसंख्या असलेल्या प्रमुख 9 शहरांसाठी येत्या 7 वर्षामध्ये किमान 18000 चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, सुरत, कोलकाता, अहमदाबाद,बेंगळुरू, या  शहरांचा समावेश आहे.

ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी परवाना?

भारत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांचा (EV)  वापर वाढवा यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे जर एखाद्या भारतीय व्यक्तीस ईव्ही चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी  कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही.मात्र, त्यासाठी उर्जा विभागाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शहरांमध्ये दर 3 किमीवर एक ईव्ही चार्जिंग स्टेशन असावे,अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसाठीचे अंतर 100 किमी, महामार्गावर 25 किमी अंतरावर स्टेशन सुरू करता येऊ शकते.

महाराष्ट्रात EV क्षेत्रामध्ये  गुंतवणूक

भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि त्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक बॅटरीजच्या निर्मिती क्षेत्रातील संधी पाहता महाराष्ट्रात या क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे. जून मध्ये तैवानच्या गोगोरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पुणे आणि औरंगाबाद येथे इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 12482 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. 

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

  • पेट्रोल डिझेल, सीएनजी वाहनाला पर्याय
  • इंधनाच्या खर्चामध्ये बचत
  • मेंटेनन्स खर्च कमी
  • टॅक्समध्येही मिळेल सवलत
  • घरामध्ये चार्जिंगची सोय, खर्चात बचत