राज्य शासनाच्या वतीने राज्यातील जनतेसाठी वेगवेगळ्या योजना रावबल्या जात आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून पप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नमो 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला,शेतकरी, मागासवर्गीय विकास योजना, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. सरकारच्या या कार्यक्रमाचा कशा प्रकारे फायदा होईल याबाबतचा थोडक्यात आढावा जाणून घ्या...
राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे विकास कामांचा आणि योजनांचा समावेश आहे.
Table of contents [Show]
महिला सशक्तीकरणासाठी विशेष अभियान
राज्य शासनाने हाती घेतलेल्या नमो 11 कलमी कार्यक्रमामध्ये राज्यातील 73 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. यामाध्यमातून 5 लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच 5 लाख महिलांना उद्योगासाठी भांडवल उपलब्ध करून देणे बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
कामगारांसाठी योजना
बांधकाम कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे संच राज्यातील 73 हजार नोंदणीकृत कामगारांना दिले जातील. त्यामुळे कामगारांना सुरक्षितपणे काम करता येणार असून कामाच्या ठिकाणी अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी शेततळे-
राज्य सरकारकडून नमो शेततळे अभियान राबविले जाणार असून राज्यातील जवळपास 73 हजार शेतकऱ्यांना शेततळी निर्माण करून दिली जाणार आहेत. तसेच या माध्यमातून मत्सशेतीसाठी देखील सहाय्य करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी भर दिला जाणार आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायद्याचा होण्यास मदत होईल.
आत्मनिर्भर गावे-
राज्यातील 73 गावांना आत्मनिर्भर गावे म्हणून विकसित करण्यात येणार असून या गावातील नागरिकांना पक्की घरे, शौचालये, गरजूंना गावातच रोजगाराची उपलब्तधा, गावातील महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन करणे यासह सौरउर्जा प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाणार आहे
गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान
गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासह गरीब आणि मागासवर्गीय समाजातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्राम सचिवालयाची उभारणी
ग्रामपंचायीचा कारभार चालतो त्यासाठी आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी ग्रामसचिवालये बांधण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 73 ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शाळा, मैदाने -
सरकारच्या 11 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शाळांची उभारणी केली जाणार आहे. 73 शाळांमध्ये विज्ञान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त क्रीडा मैदाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दिव्यांगांसाठी विशेष अभियान
दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग शक्ती अभियान राबवून दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करणे,प्रमाणपत्र देणे, प्रवासाच्या सवलती देणे, विविध योजनांचा लाभ देणे, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी भांडवल आणि कर्ज देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
शहर, तीर्थक्षेत्र, गड-पर्यटन स्थळांचा विकास
“याच बरोबर शहरांचे सौंदर्यीकरण करणे, राज्यातील तीर्थस्थळांचा आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. यामाध्यमातून रोजगार निर्मितीला देखील चालना मिळणार आहे.