विमा उद्योगातील जागतिक पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या टॉप ऑफ द टेबल (TOT) आणि मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) साठी वर्ष 2024 साठी एल.एम.एन कन्सल्टंटमधील निलेश लाहोटी आणि मनीष लाहोटी यांची निवड करण्यात आली आहे.
टॉप ऑफ द टेबलसाठी (TOT)निलेश लाहोटी हे महाराष्ट्रातील पहिलेच तर भारतातील सहावे टीओटी एजंट आहेत. त्यांचे बंधू मनीष लाहोटी हे एमडीआरटी 2024 साठी पात्र ठरले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून एल. एम. एन कन्सल्टंट आर्थिक नियोजन क्षेत्रात सेवा देत आहे. टीओटी आणि एमडीआरटी ही जागतिक पातळीवर मानाची परिषद समजली आहे. या कामगिरीमुळे एल. एम. एन कन्सल्टंट ही जगातील टॉप 1% आर्थिक सल्लागारांपैकी एक झाली असून कंपनीच्या कामाची ही पोचपावती आहे. 1996 साली कंपनी सुरु झाल्यापासून निलेश आणि मनीष हे दोघे भाऊ सातत्याने एमडीआरटीसाठी पात्र ठरत आहेत. यावर्षी टीओटीसाठी वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांतच पात्र होऊन त्यांनी नवीन पर्व सुरु केले.
टीओटी 2024 आणि एमडीआरटी 2024 साठी पात्र होणे हे आमच्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याची भावना निलेश लाहोटी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की हे यश म्हणजे टीमच्या कष्टाची आणि जिद्दीची पावती आहे. आर्थिक ध्येयांबाबत आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांचे आणि एलआयसी स्टाफचे त्यांनी आभार मानले.या सन्मानामागे सातारा विभागातील एलआयसीचे सर्व कर्मचारी आणि सिनियर बिझनेस असोसिएट अनिल बाबर यांचे त्यांनी आभार मानले.
एल. एम. एन एलआयसीसह विविध आर्थिक सेवा ज्यात लाईफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड याबाबत गुंतवणूक नियोजन करण्याबाबत ग्राहकांना सेवा देते. आमची टीम उत्तम आहे. ग्राहक आणि एलआयसी स्टाफशिवाय हे उद्दिष्ट साध्य करु शकलो नसतो असे मनीष लाहोटी यांनी सांगितले. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सर्वोत्तम सेवा देण्यास आणि भारतातील आघाडीची आर्थिक नियोजन कंपन्यांपैकी एक राहण्याचा प्रयत्न करु, असा विश्वास मनीष लाहोटी यांनी व्यक्त केला.