Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एलआयसी शेअरची किंमत वाढतेय! गुंतवणूकदारांनी काय करावे?

एलआयसी शेअरची किंमत वाढतेय! गुंतवणूकदारांनी काय करावे?

LIC share price : LIC शेअरच्या किमतीत 700 रूपयांच्यावर क्लोजिंगच्या आधारावर येत्या काही दिवसात ब्रेकआऊट दिल्यानंतर, शेअर्समध्ये चांगले चढउतार होऊ शकतात, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

LIC share price : नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) शेअर 650 रूपयांवर आल्यानंतर तो आता गेल्या 3 सत्रांपासून वाढत आहे. LIC च्या शेअर्समध्ये सलग 3-4 दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहे. सोमवारी एलआयसीचा प्रति शेअर 665.20 रूपयांवर बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यात 2 टक्क्यांनी वाढ होऊन तो इंट्रा-डे मधील 678.80 रूपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. दरम्यान आज एलआयसीच्या शेअरमध्ये 1 टक्क्याची घसरण (lic share price today) झाली आहे.


शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एलआयसीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही शॉर्ट कव्हरिंगमुळे उद्भवलेली बाऊन्स बॅक मानली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधीने नाकीनऊ आणले होते. शेअर्समध्ये सतत होणाऱ्या घसरणीमुळे अँकर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान अजूनही एलआयसीचा शेअर्स कमकुवतच आहे. जोपर्यंत तो 700 रूपयांच्या वर ब्रेकआऊट देत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदारांनी नवीन पोझिशन घेणे टाळले पाहिजे.

एलआयसीच्या शेअर्स प्राईसबाबत बोलताना, एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे सौरभ जैन सांगतात की, एलआयसीची चौथ्या तिमाहीमध्ये कामगिरी फारच कमकुवत दिसून आली. तसेच याबाबत कंपनीकडूनही काहीच आशावादी धोरण मांडण्यात आले नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत एलआयसी शेअर्समध्ये नवीन पोझिशन घेणे टाळले पाहिजे. एखाद्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर त्या शेअर्समध्ये बाऊन्स बॅक होणं, ही एक नॉर्मल गोष्ट आहे. कारण बऱ्याचवेळा लोक सततच्या विक्रीनंतर त्यांच्या शॉर्ट-कव्हरिंगपासून दूर राहतात.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांच्या मते, एलआयसी शेअर जोपर्यंत 700 रूपयांच्या खाली येत नाही; तोपर्यंत यात नवीन पोझिशन घेणे टाळले पाहिजे. आणि जर या शेअरने 700 रूपयांच्यावर ब्रेकआउट दिला तर यात मोठे चढउतार होण्याची अपेक्षा आहे. तरीही सध्या यात पोझिशन घेणं टाळलं पाहिजे.

ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म एमके (Emkay) यांच्या मते, LIC शेअर्सची 12 महिन्यातील टार्गेट किंमत 875 रूपये आहे, जी आयपीओ (IPO) इश्यूच्या किमतीपेक्षा (lic share price ipo 2022) कमी आहे. तर बॅंक ऑफ अमेरिकेच्या सिक्युरिटीजने (BoFA Securities) गुंतवणूकदारांना प्रति शेअर 930 रूपयांच्या दीर्घकालीन लक्ष्यासह खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

image source - https://bit.ly/3xMD8Kq