देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने (LIC) भारत सरकारच्या मालकीच्या एनएमडीसी (National Mineral Development Corporation) कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. एनएमडीसीचे मार्केट कॅप 31,269.56 कोटी रुपये आहे. सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी एलआयसीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, एनएमडीसीचे 6.06 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्यात आले आहेत. ते जवळपास एकूण गुंतवणुकीपैकी 2.07 टक्के इतके आहेत. या शेअर्सची विक्री कंपनीकडून 14 मार्च ते 20 जून 2023 या कालावधीत करण्यात आली आहे. एलआयसीने एनएमडीसीचा एक शेअर किती रुपयांना विकला आणि त्यातून किती रुपये कमावले, जाणून घेऊयात.
प्रति शेअरची किंमत जाणून घ्या
अहवालातील माहितीनुसार एनएमडीसी (National Mineral Development Corporation) कंपनीचा प्रति शेअर्स सरासरी 107.59 रुपयांना विकण्यात आला आहे. एलआयसीने एनएमडीसी कंपनीचे एकूण 6.06 कोटी शेअर्स विकले आहेत. ज्यातून कंपनीला जवळपास 649 कोटी रुपये मिळणार आहेत. पूर्वी एनएमडीसी कंपनीत एलआयसीची एकूण भागीदारी 11.69 टक्के इतकी होती. शेअर्सच्या विक्रीनंतर यामध्ये घट झाली आहे. ही घट पकडून सध्या 9.62 टक्के भागीदारी एलआयसीकडे राहिली आहे. LIC ने 14 मार्च 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत 34 कोटी 25 लाख 97 हजार 574 वरून 28 कोटी 19 लाख 33 हजार 850 इक्विटी शेअर्सची होल्डिंग कमी केली आहे.
एनएमडीसी कंपनीच्या शेअर्सची कामगिरी जाणून घ्या
गेल्या एका महिन्यात एनएमडीसी (National Mineral Development Corporation) कंपनीच्या शेअर्समधून केवळ 1.57 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. असे असले तरीही गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. या वर्षात आत्तापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या एका वर्षात एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समधून केवळ 3.84 टक्क्यांचे रिटर्न्स मिळाले आहेत होते.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमधील भागीदारी वाढवली
एलआयसीने (LIC) वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 या दरम्यान कंपनीने स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मधील आपली भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवली आहे. सरासरी 66.18 रुपये प्रति शेअर दराने एलआयसीने शेअर्स खरेदी केले आहेत. असे एकूण 547 कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीने खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर कंपनीच्या भागीदारीत वाढ झाली आहे.
Source: hindi.moneycontrol.com