Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Policy:'या' पॉलिसीत दररोज 250 रुपयांची केलेली गुंतवणूक मॅच्युरिटीवेळी मिळवून देईल 52 लाखांचा परतावा, सविस्तर वाचा

LIC  Jeevan Labh Policy

LIC Policy: एलआयसी जीवन लाभ पॉलिसी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली. या पॉलिसीत गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रीमियम आणि मुदत कालावधी निवडू शकतो. यामध्ये दररोज 250 रुपयांची गुंतवणूक करून 52 लाखाहून अधिक लाभ मिळवता येऊ शकतो. तो कसा, जाणून घेऊयात.

देशातील सर्वात मोठी जीवन विमा पॉलिसी कंपनी म्हणून एलआयसीला (LIC) ओळखले जाते. आपण प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील एलआयसीची पॉलिसी खरेदी केली असेलच. जर तुम्हाला एकाच पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विम्याचे फायदे घ्यायचे असतील, तर एलआयसीने एक नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे. ही एक प्रकारची नॉन लिंक्ड आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट सुविधा देणारी गुंतवणूक पॉलिसी आहे. या पॉलिसीचे नाव 'एलआयसी जीवन लाभ पॉलिसी' (LIC Jeevan Labh Policy) आहे.

अल्पावधीतच ही पॉलिसी प्रचंड लोकप्रिय झाल्याने लोक त्याचा लाभ घेत आहेत. आयकर कायद्यानुसार या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाला कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या पॉलिसीमध्ये दररोज 250 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 52 लाखाहून अधिक परतावा मिळवता येऊ शकतो. या पॉलीसीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जीवन लाभ पॉलिसीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

एलआयसीच्या जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रीमियमची रक्कम आणि मुदत निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पॉलिसीत जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहिल्यास त्याला विम्याच्या रकमेसह बोनस आणि मोठी मॅच्युरिटी रक्कम मिळणार आहे. दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या विम्याचे पैसे आणि बोनस नॉमिनीला देण्यात येईल.

सदर पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकांना लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या नफ्याचा देखील लाभांश मिळणार आहे. या पॉलिसीतील पॉलिसीधारक रिव्हर्शनरी बोनस प्राप्त करण्यास पात्र आहेत, तसेच पॉलिसी सुरू झाल्यापासून तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारक पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात. कर्जाची कमाल रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर अवलंबून असणार आहे.

अशा प्रकारे मिळवा 52 लाख रुपये परतावा

तुम्हालाही एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी खरेदी करायची असेल, तर गुंतवणूकदाराचे किमान वय 18 वर्ष तर कमाल वय 59 वर्ष असायला हवे. 25 वर्ष वयाच्या व्यक्तीने 25 वर्षाच्या मुदतीनुसार जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली, तर त्याला दरमहा 7400 रुपये या पॉलिसीमध्ये गुंतवावे लागतील.

7400 महिन्याला या हिशोबाने दिवसाला 246 रुपये या पॉलिसीत गुंतवले जातील. तसेच वार्षिक या पॉलिसीत 86,954 रुपये गुंतवले जातील. तर मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला 52,50,000 रुपये लाभ मिळणार आहे. यामध्ये समअँश्युअर्ड आणि रिव्हर्शनरी बोनस देखील समाविष्ट असणार आहे. यातील बोनसचा दर सतत बदलत असल्याने मॅच्युरिटीची रक्कम देखील बदलू शकते.

कर सवलतीचा लाभ घेता येईल का?

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर लाभासाठी पात्र आहे. दीड लाख रुपयांपर्यंत या योजनेत कर सवलत दिली जाते. मृत्यूलाभ आणि परिपक्वता लाभ देखील कायद्याच्या कलम 10 (10D) अंतर्गत करमुक्त आहेत.

Source: hindi.news18.com