देशातील सर्वांत मोठा आयपीओ, एलआयसी आयपीओ (LIC IPO)ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या आयपीओच्या शेअर्सचे आज 12 मे रोजी वाटप केले जाणार आहे. तर शेअर्सचे लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे. तुम्हाला जर एलआयसीच्या शेअर्स वाटपाचे अपडेट पाहायचे असतील तुम्ही बीएसईच्या (BSE) वेबसाईटवर पाहू शकता. ते पाहण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
एलआयसीचा आयपीओ सर्वसामान्यांसाठी 4 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि 9 मे रोजी तो बंद झाला. आज 12 मे रोजी त्याचे वाटप केले जाणार असून, अनेक जण शेअर्स मिळणार की नाही, याच्या प्रतिक्षेत आहेत. एलआयसीच्या शेअर्सचे 17 मे रोजी लिस्टिंग होणार आहे. त्याची ओपनिंगची किंमत ही 950 ते 970 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जे गुंतवणूकदार अपात्र ठरले असतील त्यांचे पैसे 13 मे पर्यंत बॅंक खात्यात जमा होतील आणि जे गुंतवणूकदार पात्र ठरले आहेत, त्यांच्या डिमॅट खात्यात 16 मे पर्यंत शेअर्स जमा होतील.
एलआयसीच्या शेअर्स वाटपाचे अपडेट असे पाहा
- सर्वप्रथम www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर इक्विटी (Equity) या पर्यायावर क्लिक करा.
- इथे ड्रॉपडाऊनमध्ये एलआयसी आयपीओ (LIC IPO) पर्याय निवडा.
- इथे तुमचा आयपीओ अर्ज क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक टाका.
- त्यानंतर व्हेरिफाय करून, सर्च बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला एलआयसी आयपीओचे शेअर अलॉटमेंट दिसतील.