Dhan Vriddhi LIC Plan: एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ ग्राहकांच्या गरजेनुसार आणि मार्केटमधील परिस्थितीनुसार इन्शुरन्सची मागणी पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आणत असते. त्याचाच भाग म्हणून एलआयसीने जून महिन्यात धन वृद्धी (Dhan Vriddhi 869) ही नवीन स्कीम आणली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना लाईफ इन्शुरन्स आणि गुंतवणुकीवरील सुरक्षितता असे दोन्ही लाभ मिळणार आहे. पॉलिसीधारकाच्या अनपेक्षित मृत्यूनंतर कुटुंबियांना या पॉलिसीतून आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. तसेच यातून हमखास परतावा मिळण्याची शाश्वती असल्याने ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता येथे पूर्ण होते. तसेच या स्कीमसाठी एकदाच प्रीमिअम भरावयाचा असल्याने सतत प्रीमिअम भरण्याचे कोणतेही दायित्वं मागे राहत नाही.
धन वृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
धन वृद्धी ही एक सिंगल प्रीमिअम पॉलिसी असून हिचा किमान कालावधी 10 वर्षांचा आहे. त्याचबरोबर यामध्ये 15 आणि 18 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेवर पॉलिसीधारकाला 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. पॉलिसीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारक ती सरेंडर करू शकतो. याच्या कालावधीच्या पर्यायानुसार या स्कीममध्ये येण्यासाठी किमान वयाची अट 90 दिवसांपासून ते 8 वर्षे इतकी आहे आणि कमाल वयोमर्यादेत 32 वर्षापासून 60 वर्षापर्यंतची अट आहे.
एखाद्या 28 वर्षांच्या व्यक्तीने उपलब्ध पर्यायांपेकी 15 लाखाच्या सम अॅश्युअर्ड असलेली स्कीम निवडली. तर त्या व्यक्तीला एकूण 14 लाख 354 हजार 687 रुपये प्रीमिअम (टॅक्ससह) भरावा लागेल. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना 17 लाख 51 हजार 156 रुपये मिळतील. दुसऱ्या पर्यायात पॉलिसीधारकाला एकदाच 12 लाख 61 हजार 333 रुपये प्रीमिअम भरल्यानंतर, मृत्यूपश्चात सुमारे 1 कोटी 23 लाख 16 हजार 500 रुपये मिळतील.