Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC: 'एलआयसी'ला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष, एलआयसी चेअरमनला मिळते इतके 'पे पॅकेज'

LIC

LIC: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत लवकरच संपणार आहे. एलआयसीचे विद्यमान अध्यक्ष एम. आर कुमार यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या 13 मार्च 2023 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ मिळते कि नवीन अध्यक्षाची घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत लवकरच संपणार आहे. एलआयसीचे विद्यमान अध्यक्ष एम. आर कुमार यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या 13 मार्च 2023 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ मिळते कि नवीन अध्यक्षाची घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'एलआयसी'च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्याचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांचे नाव आघाडीवर आहे. मोहंती फेब्रुवारी 2021 पासून व्यवस्थापकीय संचालक पदावर असून ते 30 जून 2023 पर्यंत या पदावर असतील.

'एलआयसी' कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर एक अध्यक्ष, सीईओ आणि चार व्यवस्थापकीय संचालक अशी वरिष्ठ व्यवस्थापनाची रचना करण्यात आली आहे. एलआयसी कायद्यातील सुधारणेनंतर चार व्यवस्थापकीय संचालकांनी  'एलआयसी'च्या अध्यक्षांऐवजी 'सीईओ'ला रिपोर्ट करावे लागणार आहे. वर्ष 2024 पासून ही कार्यपद्धती अंमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे. (LIC Chairman Tenure finished by March 2023)

'एलआयसी'च्या आयपीओमधून सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. एलआयसीच्या हिस्सा विक्रीतून सरकारने 20500 कोटींचा निधी उभारला. शेअर बाजारातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. आयपीओसाठी प्रती शेअर 949 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता. मात्र आयपीओनंतर शेअरच्या किंमतीत 33% घसरण झाली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एलआयसीला 16000 कोटींचा नफा झाला होता. यातील 14300 कोटींचा निधी शेअरहोल्डर्स फंडमध्ये हस्तांतर करण्याचा एलआयसीचा विचार आहे.  

कुमार यांना मिळणार तिसऱ्यांदा संधी

'एलआयसी'चे विद्यमान अध्यक्ष एम.आर कुमार यांना यापूर्वीच दोन वेळा मुदतावाढ देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडून कुमार यांना आणखी 6 ते 12 महिन्यांची मुदत वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष एम. आर कुमार यांना पहिल्यांदा जुलै 2021 ते मार्च 2022 या दरम्यान पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या वर्षी एलआयसीची शेअर बाजारात यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर अध्यक्ष एम. आर कुमार यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.  

'एलआयसी'च्या अध्यक्षांना किती पगार असतो? (How much Pay Package for LIC Chairman)

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC Chairman) अध्यक्षांना दरवर्षाला किमान 35 लाखांचे पगाराचे पॅकेज असते. याशिवाय त्यांना राहण्यासाठी प्रशस्त क्वाटर्स, गाडी, नोकर यासारख्या सुविधा मिळतात. एलआयसी अध्यक्षांच्या तुलनेत एलआयसीमधील मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांना (CFO) सर्वाधिक वेतन मिळते. एलआयसीच्या सीएफओंना वार्षिक 75 लाख ते 1 कोटींचे पॅकेज मिळते. एलआयसीकडून बड्या कॉर्पोरेट्सप्रणाने वरिष्ठ व्यवस्थापनाची रचना करण्यात आली आहे. एलआयसीने चीफ डिजिटल ऑफिसर आणि चिफ टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु केली आहे.