Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Phone Launch: Lenovo Think Phone लाँच, फीचर्स जाणून घ्या

New Phone Launch

Image Source : http://www.xda-developers.com/

Lenovo Think Phone: मोबाईल हा प्रत्येकाचा जिव्हाळयाचा विषय आहे. लोक आता मोबाईल विना राहू शकत नाही. त्यात बाजारात एका पेक्षा एक भारी मोबाईल येऊ घातले आहेत. अशातच आणखी एक मोबाईल बाजारात आला आहे, या मोबाईलविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात.

Lenovo Think Phone: आजच्या मोबाईलच्या जमान्यात नवीन मोबाईल येण्याची काही कमी नाही. यासाठी मोबाईल कंपन्याचीदेखील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्या एकापेक्षा एक मोबाईल बाजारात आणत आहेत. असाच एक मस्त मोबाईल लाँच झाला आहे. या मोबाईलचे नाव व फीचर्स जाणून घेऊयात. 

मोबाईलचे नाव व किंमत

लेनोवो थिंकफोन (Lenovo Think Phone) असे या मोबाईलचे नाव आहे. हा बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन असून मोटो की सेफसह बाजारात विक्रीसाठी आला आहे. Think phone Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे, तो 12GB RAM सह उपलब्ध आहे. फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट, OLED डिस्प्ले, 512 GB पर्यंत स्टोरेज असून  68 W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्सदेखील आहेत. या कंपनीने अजून ही या मोबाईलची किंमत जाहीर केलेली नाही. पुढील काही महिन्यात हा स्मार्टफोन युरोप, लॅटिन अमेरिका, अमेरिका, मध्य आशिया,ऑस्ट्रेलिया आणि आशियातील काही देशांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

फीचर्स

या मोबाईलमध्य Think2Think कनेक्टिव्हिटी फीचर असून, जे लेनोवो थिंकफोन आणि Thinkpad लॅपटॉपमध्ये चांगले इंटिग्रेशन देते. तसेच युजर्स ThinkPad आणि लेनोवो थिंकफोन दरम्यान सूचना, फोटो, दस्तऐवज आणि कॉपी केलेला मजकूर सिंक करू शकतात. वेबकॅमसाठी ThinkPad युजर्स लॅपटॉपद्वारे लेनोवो थिंकफोनदेखील वापरू शकतात.

काय आहे खास 

या मोबाईलला फुलएचडी रिझोल्यूशन ऑफर करणारा 6.6 इंचाचा पोलेड डिस्प्ले. डिस्प्ले पॅनलवर मध्यभागी पंच-होल नॉच आहे. या मोबाईलमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयर देण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर Think Phone मध्ये दिला गेला आहे. या  थिंकफोनमध्ये ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअप असून, स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सरदेखील आहे. जो फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन मिळवतो. या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-कॅमेरा लेन्स आणि मॅक्रो सेन्सर देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर आहे.