Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lenovo Tab P11 5G: Lenovo चा पहिला 5G एंड्रॉइड टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Lenovo Tab P11 5G

Image Source : www.notebookcheck.net

Lenovo Tab P11 5G हा टॅबलेट लिनोवोने लॉन्च केला आहे. Xiaomi Pad-5 आणि Realme Pad-X या दोन ब्रांडला हा टॅबलेट टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे.

अमेरिका स्थित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लेनोवोने (Lenovo) भारतात त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने देशात लिनिओचा पहिला 5G Android टॅबलेट लॉन्च केला आहे. Lenovo ने या टॅबला P11 5G असे नाव दिले आहे. डिव्हाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 5G प्रोसेसरद्वारे चालत असून टॅबलेटला 11-इंचाचा डिस्प्ले आहे.  

Lenovo Tab P11 5G: किंमत आणि उपलब्धता  

Lenovo Tab P11 5G दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. त्याच वेळी, टॅबच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट Amazon आणि अधिकृत Lenovo स्टोअर वरून खरेदी केला जाऊ शकतो.  

डिव्हाइस Xiaomi आणि Realme च्या मिड-रेंज 5G टॅब्लेट - Xiaomi Pad-5 आणि Realme Pad-X शी स्पर्धा करेल. Xiaomi Pad-5 ची किंमत 26,999 रुपये आहे, तर Realme Pad-X ची किंमत 25,999 रुपये इतकी आहे.  

Lenovo Tab P11 5G चे फीचर्स  

Lenovo Tab P11 5G 2000x1200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 11-इंच 2K डिस्प्लेसह दिला जाणार आहे. यात डॉल्बी व्हिजन सपोर्टसह IPS स्क्रीन आहे आणि 60Hz रीफ्रेश रेट आहे. डिव्हाइसच्या बाजूला जाड बेझल देण्यात आले आहे.  

लेनोवो Tab P11 5G Android-11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. टॅब्लेट आणि फोल्डेबल डिव्‍हाइसेससाठी Google ची कस्टम ऑपरेटिंग सिस्‍टम Android-12L देखील या डिव्‍हाइसमध्‍ये सपोर्ट करू शकते असे सांगितले जात आहे. डिव्हाइस लेनोवो प्रेसिजन पेन 2 स्टायलस आणि कीबोर्ड सारख्या इन-हाऊस अक्सेसरीजसह वापरला जाऊ शकतो. परंतु, दोन्ही उपकरणे स्वतंत्रपणे खरेदी करावी लागतील.  

Lenovo Tab P11 5G मध्ये ऑटो-फोकस फीचर्ससोबत 13MP कॅमेरा सेन्सर आहे. याच्या फ्रंटला टाइम ऑफ फ्लाइट (ToF) फीचर्ससह 8MP कॅमेरा आहे. याचा वापर करून, Lenovo Tab P11 5G कॅमेरा आणि सब्जेट यातील अंतर मोजेल आणि 3D इमेजिंग आणि जेश्चर ओळख तपासली जाईल. टॅबलेट JBL-पावर्ड स्पीकर आणि डॉल्बी ऍटमॉससह दिला जाईल. Lenovo Tab P11 5G मध्ये 7,700mAh ची बॅटरी आहे. त्यात 20W चार्जिंग  अडॉप्टर देखील उपलब्ध आहे. डिव्हाइसचा प्लेबॅक टाईम हा 12 तासांपर्यंतचा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टॅबलेटमध्ये ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 6 आणि USB-C 3.2 Gen 1 सारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये देखील आहेत.