प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना काही सुट्ट्या मिळतात . यापैकी काही सुट्ट्या अशा असतात ज्या जर तुम्ही घेतल्या नाही तर त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतात . त्याला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) म्हणतात . प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पगार पत्रकानुसार (Salary Structure) त्याला वर्षभरात किती सुट्ट्या (leave) घेता येतील याची पूर्णता कल्पना देण्यात आलेली असते याशिवाय सुट्ट्या नाही घेतल्या तर त्याच्या मोबदल्या विषयी माहिती देखील देण्यात येते . जर तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट ठाऊक असणे गरजेचे आहे की , तुमची कंपनी कोणत्या आधारावर सुट्ट्या एनकॅश करते आणि उर्वरित किती सुट्ट्यांचा मोबदला (cash) तुम्हाला देते .
Table of contents [Show]
जास्तीत जास्त 30 सुट्ट्याहोऊशकतातएनकॅश
साधारणपणे एका वर्षात जास्तीत जास्त 30 सुट्या एनकॅश करता येतात . सरकारी नोकरदारांनाही एवढ्याच सुट्या एनकॅश करण्याचा अधिकार आहे . पण याविषयी खासगी कंपन्यांच्या नियमात एकसूत्रता नाही . काही कंपन्या वर्ष संपल्यावर ही रक्कम कर्मचाऱ्यांना देतात . तर काही कंपन्या राजीनामा दिल्यानंतर ही रक्कम जमा करतात .
बेसिक सॅलरीआणिडीए (DA) वरआधारितपेमेंट
जर तुम्हाला असे वाटत असेल की एका दिवसाचा संपूर्ण पगार एका सुट्टीसाठी दिला जातो , तर हा तुमचा भ्रम आहे . Leave Encashment तुमच्या बेसिक सॅलरीवर आणि डीएवर अवलंबूनअसते . त्यानुसार पेमेंट केले जाते .
Leave Encashment कायद्यानेबंधनकारकनाही
कर्मचार्यांना जास्तीत जास्त कामासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने , कंपन्या Leave Encashmentची सुविधा देतात , परंतु Leave Encashment साठी कोणताही सरकारी नियम नाही म्हणजेच जर एखादी कंपनी तुमची लीव्ह एनकॅश करत नसेल तर तुम्ही त्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकत नाही . Leave Encashment ची सुविधा द्यायची की नाही हे कंपनीवर अवलंबून असते .
कोणत्या सुट्ट्यांना Leave Encashment मिळते ?
संघटित क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या देतात . यामध्ये आजारी रजा (Sick Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), अर्जित रजा (Earned Leave) आणि विशेषाधिकार (Privilege leave) यांचा समावेश आहे . यापैकी , जर तुम्ही वर्षात आजारी रजा आणि आकस्मिक रजा वापरली नाही तर ती संपते म्हणजेच लॅप्स होते . परंतु अर्जित रजा (Earned Leave) आणि विशेषाधिकारच्या (Privilege leave) बदल्यात पैसे घेतले जाऊ शकतात . म्हणजेच तुम्ही त्यांना कॅश (Cash) करू शकता . मात्र , या सुट्ट्या एनकॅश करण्याचे नियम कंपन्यांसाठी भिन्नअसू शकतात .