Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Netflix: जाणून घ्या रिचार्ज प्लॅनबाबत, जे Netflix साठी FREE सबस्क्रिप्शन आहेत

Free Netflix

Good News for Netflix Users: आजकाल नेटफ्लिक्स (Netflix) पाहणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या युजर्ससाठी स्वस्तात एक प्लॅन असून त्यामध्ये नेटफ्लिक्ससाठी FREE सबस्क्रिप्शन आहे. जाणून घेऊयात या प्लॅनविषयी...

Best Netflix Plans: सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षक नेटफ्लिक्सची निवड मोठया प्रमाणात करताना दिसत आहेत. वेबसीरिज पाहण्यासाठी या प्लॅटफार्मला अधिक पसंती आहे. त्यामुळे युजर्सदेखील नेटफ्लिक्ससाठी चार्ज करतात. मात्र आम्ही तुम्हाला काही असे रिचार्ज प्लॅन सांगणार आहोत. जे रिचार्ज प्लॅनसह FREE नेटफ्लिक्स देणार आहेत. चला, तर मग नेटफ्लिक्स युजर्ससाठी एक आनंदाची बातमी असून, खास तुमच्यासाठी पोस्टपेड प्लॅनव्दारे Netflix साठी FREE सबस्क्रिप्शन  उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्लॅनविषयी अधिक जाणुन घेऊयात.  

जिओचा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन (Jio Free Netflix Plan)

जिओच्या प्रत्येक युजर्सना प्रत्येक पोस्टपेड प्लॅनसह फ्री नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळत आहे. कंपनीचा हा प्लॅन दर महिन्याला 399 रुपयांपासून सुरू होतो आणि 1400 रुपयांपर्यंत जातो. या प्लॅनमध्ये 75 GB ते 300 GB पर्यंत मासिक डेटा उपलब्ध असून नेटफ्लिक्स व्यतिरिक्त, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस सारख्या सुविंधाचा लाभ दिला जातो. या प्लॅनसह Amazon प्राइम सब्सक्रिप्शन देखील दिले आहे.

एअरटेलचा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन (Airtel Free Netflix Plan)

एअरटेलच्या दोन पोस्टपेड प्लॅनसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन फ्री देण्यात आले आहे.  1199 रुपयांच्या या पहिल्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 1 नियमित + 2 अतिरिक्त फॅमिली अॅड-ऑन पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोबतच नेटफ्लिक्स बेसिक व्यतिरिक्त, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन देखील फ्री दिले आहे.

व्हीआयचे फ्री नेटफ्लिक्स प्लॅन (VI Free Netflix Plan)

व्होडाफोन व आयडिया (Vodafone Idea) युजर्सना कोणत्याही वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्लॅनमध्ये फ्री Netflix सदस्यता मिळत नाही आणि कंपनीने जुने प्लॅनदेखील बंद केले आहेत. पण, युजर्सला घ्यायची इच्छा असल्यास, ते नेटफ्लिक्स सदस्यता त्यांच्या मासिक पोस्टपेड बिलाचा एक भाग होऊ शकतात. 401 रुपयांपासून सुरू होणार्‍या, कंपनीच्या प्लॅनमध्ये निश्चितपणे Sony Liv, ZEE5, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शनदेखील दिले गेले आहेत.