Learn about BCC in Emails: आजकाल आपण अनेक कार्यालयीन कामकाजासाठी ईमेल(E-mail) वापरतो. आजही जेव्हा कोणाला अधिकृत कागदपत्रे किंवा इतर कार्यालयीन गोष्टी पाठवायची वेळ येते तेव्हा आपण ईमेलचा वापर करतो. इतकी वर्षे होऊन देखील आजही ईमेलचा ट्रेंड संपलेला नाही.आपण जेव्हा एखाद्याला ईमेल करतो तेव्हा अनेक वेळा आपण ईमेलमध्ये CC आणि BCC या गोष्टी वापरतो. पण बहुतेक लोकांना हे अजूनपर्यंत काय आहे, याची कल्पना किंवा माहितीचं नाहीये. आज आम्ही तुम्हाला ईमेलमधील BCC चा अर्थ काय आहे आणि ते कशासाठी वापरतात याबद्दल माहिती सांगणार आहोत, चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
To आणि CC बद्दल थोडं जाणून घेऊयात
मेलमध्ये To, CC आणि BCC म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरतात हे जाणून घ्यायला हवं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की To म्हणजे आपण ज्या व्यक्तीला मेल पाठवणार आहोत ती व्यक्ती. त्यामुळे त्याठिकाणी आपण त्या ठराविक किंवा एकाहून जास्त व्यक्तींचा ईमेल पत्ता टाकतो. आता CC बद्दल जाणून घेताना CC म्हणजे कार्बन कॉपी होय. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीशी कामाचा थेट संबंध नसला तरीही त्या व्यक्तीला त्या कामाची माहिती असणे गरजेचे असते, अशा वेळी CC ठेवण्यात येते. उदा. दोन जुनिअर्स ज्यावेळी एकमेकांना मेल करत असतात त्या वेळी सिनिअरला CC मध्ये ठेवले जाते, ज्यामुळे सिनिअर्सला जुनिअरच्या कामाबद्दल माहिती होत राहते.
BCC चा अर्थ काय आहे?
BCC चा फुल फॉर्म ब्लाइंड कार्बन कॉपी असा आहे. ईमेलमध्ये CC जसे कार्य करते त्याचप्रमाणे, एखाद्याला ईमेलची कार्बन कॉपी पाठवण्यासाठी BCC चा वापर केला जातो. तथापि, CC च्या विरुद्ध BCC च्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला ईमेल CC करता, तेव्हा स्वीकारणारा एकमेकांचा ईमेल पत्ता To फील्ड आणि Cc फील्डमध्ये पाहू शकतो. BCC फील्डमधील सर्व ईमेल पत्ते TO आणि CC फील्ड पासून लपवले जातात. कार्यालयातील अनेक गोपनीय कामामध्ये बऱ्याच वेळा सिनिअर्सना BCC मध्ये ठेवले जाते. To मधील व्यक्तीला CC मध्ये कोण आहे हे माहिती असते, मात्र BCC कोण आहे हे समजत नाही, मात्र BCC मध्ये असणारा व्यक्ती TO आणि CC असणाऱ्या व्यक्तीचे सर्व संभाषण पाहू शकतो.