प्रत्येक क्षेत्रामध्ये महागाई वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांनी नव्या वर्षात गाड्यांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली. सोबतच अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रामध्ये महागाई वाढल्याचे दिसत आहे. आता मनोरंजन सेवा उपभोगण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. झी एंटरटेन्मेंट, मॅक्स एंटरटेंन्मेंट, सन टीव्ही नेटवर्क यांनी प्रसारण म्हणजेच ब्रॉडकास्टिंगचे दर वाढवणार असल्याने टीव्हीचे रिचार्ज (TV channel rates Hike) देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवे दर पुढील वर्षी फेब्रुवारीपासून लागू होतील, असा अंदाज आहे.
काही चॅनेल्सचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढतील. सोनी कंपनी काही सेवांचे दर वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. डिज्ने स्टार आणि वायाकॉम 18 कंपन्यासुद्धा प्रसारण कंपन्यांशी असलेल्या कराराचा आढावा घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मनोरंजन क्षेत्रात तीव्र स्पर्धा (Tough competition in Entertainment industry)
डीडी फ्री डीश आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे मनोरंजन क्षेत्रात आधीच तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. नेटफ्लिक्स, प्राईम सारख्या ओटीटी कंपन्यांकडून सर्वोत्तम कंटेट ग्राहकांपुढे आणला जात असल्यामुळे टीव्ही, थिएटर्सवर परिणाम झाला आहे. तसेच मोबाईलवरुन ओटीटी चॅलन्स पाहणे ग्राहकांना सोयीस्करदेखील आहे. याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रातील वितरक आणि प्रसारण कंपन्यांवर झाला आहे. पुन्हा दरवाढ झाली तर कंपन्यांची स्पर्धात्मक क्षमता कमी होऊन जाईल. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानेसुद्धा चॅलनलच्या दरांबाबत नियमावली जारी केली आहे.
झी, सोनी आणि मॅक्स यांसारख्या कंपन्यांची एकापेक्षा जास्त चॅनेल्स आहेत. हे चॅनल प्रदर्शित करण्यासाठी कंपनी 'बुके ऑफ चॅनल्स' म्हणजेच एकाच कंपनीचे पाच-सहा चॅनेल्सचा रेट प्रसारक कंपन्यांशी करार करताना ठरवत असते. या ठरलेल्या दरानुसार प्रसारकाला पैसे मिळतात. मात्र, आता दर वाढल्याने या संबंधित अस्तित्वात असलेले करार पुन्हा केले जातील, आणि त्यामध्ये दर वाढवले जातील, असा अंदाज आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ग्राहकाला टीव्ही चॅनेल्सचा रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            